नाशिक -महाराष्ट्र राज्यातील विनाअनुदानीत शाळांमधील शिक्षकांवर मुंबईत झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ मंगळवारी छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
शिक्षकांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ छात्रभारती विद्यार्थी संघटनेकडून मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन - cm fadnavis news
विनाअनुदानीत शाळांमधील शिक्षक मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलनाला बसले असताना त्यांच्यावर लाठीचार्ज झाला. याच्या निषेधार्थ छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला.
छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे आंदोलन
राज्यातील विनाअनुदानीत शाळांमधील शिक्षक 5 ऑगस्टपासुन मुंबईच्या आझाद मैदानावर विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसले आहेत. त्याच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. याचा निषेध म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन केल्याची माहिती छात्र भारतीच्या आंदोलक विद्यार्थ्यांनी दिली.
Last Updated : Aug 28, 2019, 10:59 AM IST