नाशिक -पोलीस भरती परीक्षेत कमी मार्क्स मिळाल्याने तरुणाने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार सिडकोत उघडकीस आला आहे. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राहुल चौगुले असे मृत तरुणाचे नाव आहे.
उपचार सुरू असताना झाला मृत्यू -
अंबड येथील एक्सलो पॉइंट परिसरातील भानुदास चौगुले यांचा मुलगा राहुल याने गेल्या आठवड्यातच पोलीस भरतीची परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल ऑनलाइन जाहीर झाल्यानंतर आपण त्यामध्ये नापास झाल्याने त्याला नैराश्य आले. या नैराश्येतून राहुलने शनिवार रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर त्याला उलट्या व अन्य त्रास होऊ लागल्याने वडील भानुदास चौगुले यांनी राहुलला खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना रविवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला आहे. राहुल हा गेल्या एक वर्षापासून पोलीस भरतीचा अभ्यास करत होता. परंतु अभ्यास करून हे यश मिळाले नाही म्हणून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
हेही वाचा - citizenship amendment law पंतप्रधान, गृहमंत्र्यांसह भाजपच्या अध्यक्षांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल