महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 4, 2021, 5:39 PM IST

Updated : Jul 4, 2021, 6:55 PM IST

ETV Bharat / city

नाशकात एमपीएससीच्या भोंगळ कारभाराविरुद्ध छात्र भारती संघटनेचे आंदोलन

राज्य सेवा आयोगाच्या भोंगळ कारभाराविरुद्ध छात्र भारती संघटनेने हुतात्मा स्मारक येथे आंदोलन केले आहे. राजकीय पक्ष गर्दी करतात ते चालते. पण विद्यार्थांच्या मुलाखतीवेळी कोरोना होतो, अशी टीका यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

नाशिक
नाशिक

नाशिक - राज्य सेवा आयोगाच्या भोंगळ कारभाराविरुद्ध छात्र भारती संघटनेने हुतात्मा स्मारक येथे आंदोलन केले आहे. राजकीय पक्ष गर्दी करतात ते चालते पण विद्यार्थांच्या मुलाखतीवेळी कोरोना होतो, अशी टीका यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

नाशकात एमपीएससीच्या भोंगळ कारभाराविरुद्ध छात्र भारती संघटनेचे आंदोलन

विद्यार्थी संघटना आक्रमक

नाशिकच्या हुतात्मा स्मारकमध्ये छात्र भारती संघटनेच्या वतीने राज्यसरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. राज्य सेवा आयोगाच्या भोंगळ कारभाराला कंटाळून पुण्यातील विद्यार्थ्याने काल केलेल्या आत्महत्येमुळे विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

'विद्यार्थ्याची आत्महत्या नसून या व्यवस्थेने केलेला खून'
पुण्यात राज्यसेवा आयोगाची तयारी करणार्‍या २४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. त्यामुळे राज्यभरातील एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी संतप्त झाले आहे. घटनेचा निषेध म्हणून छात्र भारती संघटनेने हुतात्मा स्मारक येथे राज्यसरकारविरुद्ध आंदोलन करुन जोरदार घोषणाबाजी केली आहे. मागील दीड वर्षात राज्य शासनाने सात ते आठ वेळा एमपीएससी परिक्षा पुढे ढकलली आहे. जे विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले त्यापैकी अनेकांना अद्याप नियुक्ती न दिल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य येत आहे. या नैराश्यातूनच पुणे येथील २४ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली. पण ही आत्महत्या नसून या व्यवस्थेने केलेला खून आहे. असा गंभीर आरोप छात्र भारती संघटनेने केला आहे. यावेळी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

हेही वाचा -विशेष मुलाखत : क्राईम आणि वेब सिरीज या विषयांवर अभिजीत खांडकेकरशी केलेली बातचीत

Last Updated : Jul 4, 2021, 6:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details