महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नाशिक जिल्ह्यात कठोर निर्बंध - Collector Suraj Mandhare

राज्यासंह नाशिक जिल्ह्यात कोरोना संसर्गाने डोके वर काढले असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी जिल्हाप्रशासनाने अंशत: लाॅकडाऊन जाहीर केला आहे.

Strict restrictions in Nashik district to prevent corona infection
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नाशिक जिल्ह्यात कठोर निर्बंध

By

Published : Mar 9, 2021, 2:35 AM IST

नाशिक - राज्यासंह नाशिक जिल्ह्यात कोरोना संसर्गाने डोके वर काढले असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी जिल्हाप्रशासनाने अंशत: लाॅकडाऊन जाहीर केला आहे. त्यानूसार जीवनावश्यक वस्तू, मेडिकल व रुग्णालये वगळता सायंकाळी ७ ते सकाळी ७ या वेळेत सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. तसेच धार्मिक, राजकीय व सामुदायिक सोहळयांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. आज (मंगळवार) मध्यरात्रीपासून हे आदेश शहर व जिल्ह्यासाठी अनिश्चित कालावधीसाठी लागू राहतील.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर कठोर निर्बंध-

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सोमवारी (दि.८) राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांची व्हिसीद्वारे बैठक घेत कोरोना संसर्गाचा आढावा घेतला आहे. त्यानंतर कोरोना संसर्गाला अटकाव घालण्यासाठी लाॅकडाऊन नाही पण काही निर्बंध लावून त्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी गर्दी टाळण्यासाठी आज मध्यरात्रीपासून सायंकाळी ७ ते सकाळी ७ या वेळेत मेडिकल व जीवनावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील, असे आदेश जारी केले आहेत.

नाशिक, निफाड, नांदगाव व मालेगाव या तालुक्यांमध्ये सर्वाधिक करोना संसर्ग-

नाशिक, निफाड, नांदगाव व मालेगाव या तालुक्यांमध्ये सर्वाधिक करोना संसर्ग असल्याने येथील शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस तसेच जिल्ह्यातील आठवडे बाजार पुढिल आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. नाशिक महापालिका हद्दितील शाळा अगोदरच महापालिका आयुक्तांनी बंद ठेवल्या आहेत. वरील चारही तालुक्यातील शाळा बंद ठेवण्याच्या आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.लीना बनसोड यांनी दिले आहेत.

१५ मार्चनंतर लाँन्स, हॉलमधील लग्नसोहळ्यांना परवानगी-

दहावी व बारावीच्या परिक्षांच्या तारखा ठरलेल्या असल्याने त्यांचे वर्ग सुरु राहतील. मात्र विद्यार्थ्याना उपस्थिती ऐच्छिक असेल. महाविद्यालयांनी आँँनलाईन वर्गाची व्यवस्था केली तर उत्तम राहील. येत्या १५ मार्चपर्यंत ज्या लग्नसोहळे व धार्मिक विधीना परवानगी देण्यात आली आहे. त्यांनी अटीशर्तीसह कोरोना सुरक्षा नियम पाळून हे सोहळे करणे बंधनकारक ठरेल. परतु १५ मार्चनंतर लाँन्स, हॉलमधील लग्नसोहळ्याना परवानगी नाही. तसेच गर्दी होणार नाही याची दक्षता घेतली जाणार असून नियमांचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाप्रशासनाने सांगितले आहे.

गर्दी टाळण्यासाठी कठोर उपाय योजना-

करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गर्दी टाळण्यासाठी कठोर उपाय योजनाची अंमलबजावणीचे आदेश दिले. त्यानुसार सायंकाळी ७ ते सकाळी ७ यावेळेत मेडिकल व जीवनावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील. तसेच इतर निर्बंध देखील लावण्यात आले असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आव्हान जिल्हाधिकारी सूरज मांढरे यानी केले आहे.

हेही वाचा-मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण : एनआयएने तपास योग्य दिशेने करावा - अनिल देशमुख

ABOUT THE AUTHOR

...view details