नाशिक - निफाडमध्ये औरंगाबाद-नाशिक महामार्गावर कादवा नदीच्या पुलावर डंपर गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये गाडी हवेत विचित्र पद्धतीने अडकल्यामुळे येणारे-जाणारे नागरिक घाबरून गेले होते.
नाशिकच्या निफाडमध्ये डंपरचा विचित्र अपघात - महामार्गावर गर्दी
निफाडमध्ये औरंगाबाद-नाशिक महामार्गावर कादवा नदीच्या पुलावर डंपर गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये गाडी हवेत विचित्र पद्धतीने अडकल्यामुळे येणारे-जाणारे नागरिक घाबरून गेले होते.
पिकपचा आधार घेत ड्रायव्हरची सुटका
या अपघातात मालवाहतूक डंपरचे बोणेट पुलाच्या वरच्या भागात अडकल्यामुळे डंपरचा पुढचा भाग वरती झाला होता. त्यामुळे डंपरचा ड्रायव्हर व त्याचा साथीदार गाडीतच अडकून बसले होते. मात्र तेथील जमलेल्या नागरिकांनी प्रसंगावधान राखत पिकपचा आधार घेत त्यांना खाली उतरविले. सुदैवाने कोणतीही जीवितहाणी या अपघातामध्ये झाली नाही. अपघात झाल्यानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. काही वेळानंतर निफाड पोलीस घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. खासगी क्रेनच्या सहाय्याने डंपरला पुलाच्या बाहेर काढण्यात आले आहे.
हेही वाचा -मोदींची महाराष्ट्राला सापत्न वागणूक, गुजरातला दिले 1 हजार कोटी