महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दीनिमित्त मनमाडमध्ये राज्यस्तरीय साहित्य संमेलन

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त लाल सेनेच्या वतीने मनमाड येथे राज्यस्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे नियोजित अध्यक्ष पत्रकार सुधीर ढवळे हे सध्या तुरुंगात आहे.

State level literary gathering in Manmad
मनमाडमध्ये राज्यस्तरीय साहित्य संमेलन

By

Published : Dec 23, 2019, 10:10 AM IST

नाशिक -लाल सेनेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने मनमाड येथे 16 वे राज्यस्तरीय साहित्य संमेलन भरवण्यात आले. प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य डोक्यावर घेत भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करत येवला रोडवरील हॉलमध्ये या संमेलमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी राज्यभरातील हजारो साहित्यिक व विद्रोही कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दी निमित्त मनमाडमध्ये राज्यस्तरीय साहित्य संमेलन

हेही वाचा... 'सीएए व एनआरसीवरुन शहरी नक्षलवादी पसरवत आहेत अफवा'

मनमाडमध्ये होत असलेल्या या साहित्यसंमेलनाचे नियोजित अध्यक्ष पत्रकार सुधीर ढवळे हे सध्या तुरुंगात आहेत. तरीही लाल सेनेने त्यांना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्याचे मोठे धाडस केले आहे. तसेच शनिवारी शरद पवार यांनी भीमा कोरेगाव प्रकरणाची चौकशीची मागणी केली. केवळ पुस्तक सापडले म्हणून गुन्हा दाखल होत असेल, तर तशी पुस्तके माझ्याकडेही आहेत. पवारांच्या या भूमिकेचे कबीर कला मंचच्या वतीने स्वागत करण्यात आले असल्याचे अध्यक्ष सागर गोरखे यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा... पीएमसी बँक घोटाळा : अध्यक्ष वरियंम सिंग यांच्या घराबाहेर आंदोलन

पत्रकार सुधीर ढवळे यांच्यावर एल्गार परिषदेत भाषण करून भीमा कोरेगाव येथे दंगली घडविल्या असल्याचा खोटा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे मनमाडमध्ये आयोजित केलेल्या साहित्य संमेलनाला चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कबीर कला मंच व समता कला मंचने यावेळी शाहिरी जलसा करत संमेलनाचे उद्घाटन केले. यावेळी सुकुमार कांबळे, लाल सेनेचे प्रमुख कॉम्रेड गणपत भिसे यांच्यासह अनेक विद्रोही साहित्यिक उपस्थित होते.

हेही वाचा... 'गोळ्या झेलू, ...या मातीसाठी रक्ताची होळी कधी बी खेळू'

संघाच्या ध्येयधोरणानुसार भाजप सध्या भूमिका मांडत आहे. जे कोणी वंचीत दलित अल्पसंख्याक कष्टकरी यांच्या बाजूने उभे राहत आहे, त्या सगळ्यांचा आवाज दडपण्याचे षडयंत्र भाजप सरकार करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मागील वर्षी भीमा कोरेगाव येथे दंगा झाला. खरे तर तो दंगा संभाजी भिडे आणि एकबोटेंनी घडवून आणला होता, असा आरोप सागर गोरखे यांनी केला. तरीही भिडे आणि एकबोटे मात्र मोकाट आहेत. तर याऊलट एल्गार परिषदेत ज्यांनी भाषणे केली, त्यांच्यावर खोटा खटला दाखल करून त्यांना जेलमध्ये डांबण्यात आले असल्याचे अध्यक्ष सागर गोरखे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा... 'शेतकऱ्यांप्रमाणे मागासवर्गीय महामंडळांचीही कर्ज माफ करा'

यावेळी समता कला मंचच्या समिक्षा मौर्य यांनी देखील सरकारवर टीका करत, एनआरसी हा कायदा असंवैधानिक असूनही तो अंमलात आणला आहे. त्याचा आम्ही निषेध करतो आणि याचा विरोध करण्यासाठी आम्ही जनतेचा बुलंद आवाज उठवणार असल्याचे सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details