नाशिक - सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SPMCIL) महाराष्ट्रातील नाशिक आणि मध्य प्रदेशच्या देवासमध्ये नवीन बँक नोट प्रिंटिंग लाइन्स बसवण्यात ( Bank Note Printing Lines ) आले आहेत. नाशिकमधील चलनी नोटा छापण्याच्या जेलरोड येथील करन्सी प्रेसमध्ये बसवण्यात आलेल्या नवीन बँक नोट प्रिंटिंग लाइनचे गुरुवारी उद्घाटन झाले.
सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही एक अनुसूचित -‘अ’ मिनीरत्न श्रेणी-I केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रम आहे, जो संपूर्णपणे भारत सरकारच्या आर्थिक व्यवहार विभागाच्या (DEA), वित्त मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे. 10 फेब्रुवारी 2006 सेक्युरीटी प्रिंटिंग-मिटींग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड स्थापन करण्यात आली होती.