महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाशिक-मुंबई महामार्ग बनला मृत्युचा सापळा...

मुंबई ते नाशिक हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनल्याचे समोर आले आहे. रस्त्यावरील खड्डे, वाहनधारक वाहतूक नियमकडे करत असलेले दुर्लक्ष यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून राज्यातील पुणे, नगर पाठोपाठ नाशिक-मुंबई महामार्गावर होणाऱ्या अपघाताच्या घटना चिंतेचा विषय बनला आहे.

accidents in nashik
नाशिक-मुंबई महामार्ग बनला मृत्युचा सापळा...

By

Published : Dec 28, 2020, 6:46 PM IST

नाशिक -मुंबई ते नाशिक हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनल्याचे समोर आले आहे. रस्त्यावरील खड्डे, वाहनधारक वाहतूक नियमकडे करत असलेले दुर्लक्ष यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून राज्यातील पुणे, नगर पाठोपाठ नाशिक-मुंबई महामार्गावर होणाऱ्या अपघाताच्या घटना चिंतेचा विषय बनला आहे.

नाशिक-मुंबई महामार्ग बनला मृत्युचा सापळा...
लॉकडाऊनमुळे महामार्गावरील अपघातांना काहीसा ब्रेक लागला असतांना आता पुन्हा एकदा अपघाताच्या संख्येत वाढ होते असल्याचे दिसत आहे. नाशकातील नाशिक-मुंबई आणि नाशिक-पुणे महामार्गावरील रस्त्यावर पडलेले खड्डे, बायपास, तसेच वाहनधारकांकडून सर्रास वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. 2018 मध्ये नाशकात सर्वधिक 518 गंभीर अपघात झाले होते. त्यात 557 जणांचा मृत्यू झाला होता आणि या महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे.महामार्गावरील अपघातांची कारणे

महामार्ग पोलिसांच्या म्हणण्यानुसार लेन कटींग, ओव्हरटेक करणे, जोरात वाहन चालवणे, दारू पिऊन वाहन चालवणे, विना हेल्मेट वाहन चालवणे, रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वाहन चालवणे तसेच प्रवासी वाहनांतून वाहतूक करणे यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील महामार्गावर एक हजारहून अधिक ब्लॅक स्पॉट असून ते कमी करण्यासाठी महामार्ग पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएसआरडीसी एकत्रित उपाययोजना करणार आहे. यामुळे येणाऱ्या काळात काही प्रमाणात अपघातांची संख्या घटली आहे.

महामार्ग पोलिसांचे "ऑपरेशन मृत्युंजय"

राज्यातील महामार्गावरांवरील अपघात कमी करण्यासाठी राज्य महामार्ग पोलीस 'ऑपरेशन मृत्युंजय' ही संकल्पना राबवणार असून यामध्ये पहिल्याच टप्प्यात 10 टक्के अपघातांची संख्या कमी करण्यावर भर देणार आहेत. यासाठी राज्यातील पुणे, नाशिक, नगर या जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. ऑपरेशन मृत्युंजय अंतर्गत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासोबतच महामार्ग पोलीस प्रबोधन देखील करणार आहेत. तसेच प्रत्येक गावात मृत्युंजय दूतांचे गट तयार करण्यात येणार असून अपघाताच्या वेळेस जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासंबंधी प्रशिक्षण पुरवण्यात येणार आहे. या उपक्रमात युवकांसोबत स्थानिक डॉक्टरांची मदत देखील घेतली जाणार आहे.

राज्यातील महामार्गावरील अपघात

वर्ष एकूण अपघात गंभीर मृत्यू
2019 32 हजार 925 11 हजार 708 12 हजार 788
2020 (नोव्हेंबर) 22 हजार 340 89 हजार 286 9 हजार 997

ABOUT THE AUTHOR

...view details