महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोनाचा फटका; 'त्या' चुकीच्या अफवांमुळे सलून व्यावसायिक धास्तावले... - चिकन खाल्ल्याने कोरोना होतो

एका अफवेमुळे देशात चिकन उद्योगाला करोडो रुपयांचा फटका बसला. ही बाब आपल्या व्यवसायावर तर येणार नाही ना, या भीतीने सलून व्यवसायिक धास्तवले आहेत. मध्यप्रदेशमध्ये एका सलून चालकामुळे 6 जणांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरल्या.

Billu
व्यथा व्यक्त करताना व्यावसायिक

By

Published : Apr 28, 2020, 4:21 PM IST

Updated : Apr 28, 2020, 5:15 PM IST

नाशिक- चिकन खाल्ल्याने कोरोना होतो, या एका अफवेमुळे देशात चिकन उद्योगाला करोडो रुपयांचा फटका बसला. ही बाब आपल्या व्यवसायावर तर येणार नाही ना, या भीतीने सलून व्यवसायिक धास्तवले आहेत. सलून व्यावसायिकांचा रोज अनेक ग्राहकांशी जवळून संपर्क येतो. सलून चालक हे एकच नॅपकिन हा अनेक ग्राहकांना वापरतात. त्यामुळे कोरोना संसर्ग होण्याची शक्यता अधिक असल्याचे मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे संचारबंदीनंतर दुकाने सुरू झाली, तरी ग्राहक येतील का ? असा प्रश्न सलून चालकांना पडला आहे.

कोरोनाचा फटका; 'त्या' चुकीच्या अफवांमुळे सलून व्यावसायिक धास्तावले...

नाशिक शहरात 3000 ते 3500 सलून चालक असून तेवढेच लेडीज पार्लर आहेत. या व्यवसायावर निर्भर असणाऱ्या व्यक्तींची संख्या 50 हजार इतकी आहे. मात्र सलून व्यवसाय अडचणीत येतो की काय असा प्रश्न सलून चालकांना पडला आहे. मध्यप्रदेशमध्ये एका सलून चालकामुळे 6 जणांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरल्या. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा बातम्यामुळे संचारबंदीनंतर ग्राहक सलूनमध्ये येतील की नाही, याची धास्ती सलून चालकांना पडली आहे.

नाशकातील प्रत्येक सलूनमध्ये दोन ते तीन कारागीर काम करतात आणि त्यांना रोज कामाच्या स्वरूपात पैसे दुकान मालक देत असतो. मात्र आता संचारबंदीला महिना उलटून गेला असून त्यांना दोन वेळच्या खाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. सलून असोसिएशनने अशा गरीब कुटुंबाना काही दिवसाचा किराणा देऊ केला आहे. मात्र, अनेक सलून कारागिरांनी भीती पोटी व्यवसाय बदलण्याचा विचारही केला आहे.

आम्ही शासनाच्या नियमांचे पालन करु. संचारबंदीनंतर इतर दुकानांबरोबर सलून व्यवसाय बाबात सरकारने सकारात्मक विचार करावा. आम्ही सरकारला दिलेल्या निर्देशांचे पालन करु. दुकानात येणार्‍या प्रत्येक ग्राहकाची तसेच दुकानात काम करणाऱ्या कारागिराची काळजी घेऊ. प्रत्येक ग्राहकांसाठी स्वतंत्र नॅपकिनचा वापर करत सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे याचे देखील पालन करू.

Last Updated : Apr 28, 2020, 5:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details