महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आश्रमशाळेतील 'ती' मुलगी प्रेमप्रकरणातून गर्भवती; आरोपीविरुद्ध तक्रार दाखल - खरबडी

आश्रमशाळेत शिकणारा दहावीतील मुलगा आणि संबंधित मुलगी पेठ तालुक्यातील खामखेडा येथील रहिवासी आहेत. ते एकमेकांचे नातलग आहेत. शाळेत दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. यातून विद्यार्थीनी गर्भवती राहिली.

संग्रहीत छायाचित्र

By

Published : Apr 8, 2019, 11:04 AM IST

नाशिक - पेठ तालुक्यातील खरबडी येथील शासकीय आश्रमशाळेत सहावीच्या वर्गात शिकणारी मुलगी गर्भवती राहिली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे. मुलीच्या पालकांनी त्याच शाळेत दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याविरोधात हरसूल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

आश्रमशाळेत शिकणारा दहावीतील मुलगा आणि संबंधित मुलगी पेठ तालुक्यातील खामखेडा येथील रहिवासी आहेत. ते एकमेकांचे नातलग आहेत. शाळेत दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. यातून विद्यार्थीनी गर्भवती राहिली. रविवारी हा प्रकार उघड झाल्यानंतर मुलीच्या पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यावेळी दोन्ही कुटुंबीयांनी त्यांचे लग्न लावून देण्याची तयारी दाखवली. मात्र, दोघेही अल्पवयीन असल्याने त्यांना लग्न करण्याची परवानगी पोलिसांनी दिली नाही. पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी तिला त्र्यंबकेश्वर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, हरसूल येथेही ग्रामीण रुग्णालय असल्यामुळे वैद्यकीय तपासणी करता येणार नाही म्हणून त्यांना परत पाठवण्यात आले.


नियमित आरोग्य तपासणीवर प्रश्नचिन्ह


आश्रमशाळेत शिकत असलेल्या मुला-मुलींची नियमित आरोग्य तपासणी होते. मात्र, ३ महिने उलटले तरी मुलगी गर्भवती राहिल्याचा प्रकार आश्रमशाळेतील अधीक्षकांच्या कसा लक्षात आला नाही, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा होत आहे. या प्रकारामुळे आश्रम शाळेतील मुलींच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ग्रामीण भागातील वाडी-वस्तीवर शिक्षणाची सुविधा नसल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात मुले-मुली आश्रमशाळेत शिकण्यासाठी पाठवतात. मात्र, अशा घटनांमुळे आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या पालकांपासून दूर राहणाऱ्या मुलींच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details