महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

व्हिटॅमीन 'सी' गोळ्यांची मागणी वाढली; लवकरच तुटवडा भासण्याची शक्यता - vitamin c tablets in nashik

रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमीन 'सी'च्या गोळ्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने येणाऱ्या काळात त्याचा तुटवडा भासण्याची चिंता औषध वितरकांनी व्यक्त केली आहे.

nashik news
व्हिटॅमीन 'सी' गोळ्यांची मागणी वाढली; लवकरच तुटवडा भासण्याची शक्यता

By

Published : Apr 15, 2020, 3:12 PM IST

नाशिक -रोग प्रतिकारक शक्ती वाढवणासाठी व्हिटॅमीन 'सी'च्या गोळ्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने येणाऱ्या काळात त्याचा तुटवडा भासण्याची चिंता औषध वितरकांनी व्यक्त केली आहे. यासोबतच घशाच्या संसर्गावर वापरल्या जाणाऱ्या अॅझिथ्रोमायसीन आणि कोरोनाच्या रुग्णांच्या देण्यात येणाऱ्या हायड्रोक्सइलॉरोक्वीनच्या गोळ्यांमध्ये देखील काही प्रमाणात तुटवडा जाणवत आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे आयत आणि निर्यातीवर देखील खीळ बसलीय. औषधे उत्पादनांसाठी लागणारा 60 ते 70 टक्के कच्चा माल चीनमधून येत असल्याने त्याचा विपरित परिणाम औषध आयातीवर होऊ शकतो. त्यातच सध्या बाजारात रोग प्रतिकारक शक्ती वाढवणासाठी लागणाऱ्या व्हिटॅमिन-सी च्या गोळ्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने भविष्यात या गोळ्यांचा तुटवडा जणवू शकतो, असे औषध वितरकांचे मत आहे. सध्या डेटॉल देखील बाजारात मिळत नसल्याचे औषध विक्रेते सांगतात.

ABOUT THE AUTHOR

...view details