नाशिक -महामारीच्या काळात मागणी जास्त आणि उत्पादन कमी असल्याने अंड्यांच्या दरात वाढ झाली आहे. होलसेल भावात 6 रुपये नग मिळणारे अंडे ग्राहकांना किरकोळ बाजारात 7 ते 8 रुपयांना खरेदी करावे लागत आहे.
नाशिक : अंड्यांच्या मागणीत २५ ते ३० टक्क्यांनी वाढ; 'हे' आहे कारण - eggs latest rate in Nashik
रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी डॉक्टरांकडून अंडी खाण्याचा देण्यात येणार सल्ला आणि कमी उत्पादन या कारणांनी अंड्यांच्या किमती वाढल्या आहेत. हीच परिस्थिती डिसेंबरपर्यंत राहण्याची शक्यता आहे.

कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी डॉक्टर अंडी खाण्याचा सल्ला नागरिकांना देत आहे. त्यामुळे नागरिकांकडून अंडी खरेदीचे प्रमाण वाढले आहे. नाशिकमध्ये अंड्यांची मागणी 25 ते 30 टक्यांनी वाढली आहे. मात्र, त्या तुलनेत पुरवठा नसल्याने त्यांच्या दरात वाढ झाली आहे.
भाव वाढूनही नागरिकांकडून अंड्यांच्या मागणीत घसरण झाली नाही. शहरात रोज 5 लाख अंड्यांची मागणी असते. यामधील 3 लाख अंडी ही नाशिकसह राज्यातील वेगवेगळ्या शहरांतून नाशिकमध्ये येतात. तर 2 लाख अंडी ही बंगळुरूहून शहरात दाखल होतात.