नाशिक -कोरोना मुळे यंदा हज यात्रेसाठी एक लाख रुपये अधिक मोजावे लागणार असून 2121 मध्ये होणाऱ्या हज यात्रेसाठी अर्ज भरण्यासाठी भाविकांचा अल्प प्रतिसाद असल्याचे दिसून येत आहे.
कोरोना मुळे हज यात्रेसाठी भाविकांचा अल्प प्रतिसाद कोरोना मुळे मागील वर्षी हज यात्रा रद्द करण्यात आली होती. मात्र, या वर्षी 2121 मध्ये ही यात्रा होणार असून ह्यासाठी अर्ज भरण्यास सुरवात झाली आहे. मात्र कोरोना मुळे आणि एक लाख रुपये अधिक मोजावे लागणार असल्याने नाशिक मधून भाविकांचा अर्ज भरण्यास अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे यात्रेकरूंना केंद्र व राज्य हज समितीने अर्ज भरण्यास 10 जानेवारी 2021 पर्यंत मुदतवाढ दिली आहेत.
2020 ची यात्रा कोरोना मुळे रद्द करण्यात आली होती. तेव्हा यात्रेकरूंनीं भरलेली संपूर्ण रक्कम त्यांना कोणत्याही कपाती शिवाय केंद्रीय हज समितीकडून परत करण्यात आली होती. मात्र, 2021 ची हज यात्रा होणार असल्याचे समितीकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यांचे अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पासपोर्ट, आधार कार्ड, बँक पासबुक, रक्तगट अशी माहिती आणि बंधनकारक करण्यात आली आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. हज कमिटीकडून जाहीर करण्यात आलेल्या गाईडलाईन नुसार यावर्षी हज यात्रेकरूंना यात्रेसाठी 3 लाख 75 हजार रुपये भरावे लागणार आहे. प्रारंभी 1 लाख 50 हजार रुपये जमा करावे लागणार आहे. 2019 मध्ये यात्रेचा खर्च 2 लाख 60 हजार रुपये होता. त्यावेळी सुरुवातीला 81 हजार रुपये जमा करावे लागत आहेत. याशिवाय कोरोना मुळे जागांचा कोटा सुद्धा कमी करण्यात आला आहे. यामुळे कमी यात्रेकरूंना हजला जाण्याची संधी मिळणार आहे.
कमी यात्रेकरूंना हजला जाण्याची संधी -
यंदा हज कमिटीने महाराष्ट्रातून हज ला करण्यास 50 हजार प्रवाशांचा कोटा दिला आहे. हाच कोटा मागच्या वर्षी 1 लाख 75 हजार इतका होता. नाशिकला 2019 मध्ये 15 हजार प्रवाशांचा कोटा दिला होता. तो या वर्षी केवळ 6 हजार इतका आहे. कोरोना मुळे यंदा यात्रेकरूंची विशेष काळजी घेतली जाणार असून यंदा बस मध्ये केवळ 15 ते 20 यात्रेकरु असणारा आहेत. हॉटेल मधील रूम मध्ये देखील 1 ते 2 लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा यात्रेकरूंना अधिक पैसे मोजावे लागणार असून 2019 मध्ये हजला जाण्यासाठी 2 लाख 60 हजार रुपये खर्च होता, तो आता 3 लाख 30 हजार आहे. 1लाख रुपये जादा द्यावे लागणार असून अर्ज दाखल करण्याची मुदत देखील 10 जानेवारी पर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे हज ट्रॅव्हलर्स हाजी फारुख तांबोळी यांनी सांगितले आहे.