नाशिक -त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शासकीय कन्या आश्रम शाळेत ( Government Girls Ashram School ) शिक्षकाने मासिक पाळी असल्याने एका विद्यार्थिनीला ( female student ) झाड लावण्यास मजाव केल्याची धक्कादायक घटना ( Shocking incident ) घडली आहे. या बाबत विद्यार्थिनीनी ई-टीव्ही भारतकडे कैफियत मांडली आहे.
एकीकडे भारत देश आधुनिक तंत्रज्ञानाकडे वाटचाल करत असतानातच, दुसरीकडे मात्र ग्रामीण भागात ( rural areas ) अजूनही अंधश्रद्धा (Superstition) बघायला मिळत आहे. अशीच एक घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शासकीय कन्या आश्रम शाळेत घडली आहे. शाळेच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम दरम्यान शिक्षक आर.टी. देवरे यांनी अजब फतवा काढत, ज्या मुलींना मासिक पाळी आहे, त्यांनी झाड लावू नये. मागच्या वेळेस झाडे जगली काही, असे म्हणत त्यांनी अकरावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला झाड लावण्यास मज्जा केला आहे. शिक्षकाच्या या वर्तणुकीमुळे सर्वच आश्चर्य व्यक्त करत आहेत.
ग्रामीण भागात अजून आहे अंधश्रद्धा -ग्रामीण भागात आजही अनेक अंधश्रद्धाचे प्रकार बघायला मिळतात. जादूटोना, पैशाचा पाऊस, दरवाजाला लिंबू मिरची लावणे, साप मारल्यावर त्याचे तोंड ठेचने, रात्री नख न कापणे, इच्छापूर्तीसाठी नदीत पैसे टाकणे, स्मशान- भुमीतून आल्यावर आंघोळ करणे, यासारख्या अनेक अंधश्रद्धा आजही ग्रामीण भागात बघायला मिळतात.