महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Youth Sena chief Aditya Thackeray राज्यातील शिंदे फडणवीस सरकार लवकरच कोसळणार, आदित्य ठाकरेंची जोरदार टीका - बंडखोर आमदार

Youth Sena chief Aditya Thackeray राज्यात असलेले सध्याचे सरकार हे तात्पुरत्या स्वरूपाची असून बेकायदेशीर असलेले हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार आगामी काळात लवकरच मध्यवर्ती निवडणूक होतील यासाठी तुम्ही तयार आहात ना असे आवाहन शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मालेगावकरांना केले आहे

Aditya Thackeray
Aditya Thackeray

By

Published : Aug 21, 2022, 6:57 AM IST

मालेगावनाशिक राज्यात असलेले सध्याचे सरकार हे तात्पुरत्या स्वरूपाची असून बेकायदेशीर असलेले हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार आगामी काळात लवकरच मध्यवर्ती निवडणूक होतील यासाठी तुम्ही तयार आहात ना असे आवाहन शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे Youth Sena chief Aditya Thackeray यांनी मालेगावकरांना केले आहे. यावेळी सर्वांनी हात उंचावून आम्ही सोबत असल्याचे ठाकरे यांना सांगितले. आदित्य ठाकरे मालेगाव येथे आले होते. यानिमित्त आयोजित जाहीर सभेत त्यांनी वक्तव्य केले आहे.

राज्यातील शिंदे फडणवीस सरकार लवकरच कोसळणार

दादा भुसे यांच्यावर जोरदार टीकाराज्यातील सत्ता नाट्य झाल्यानंतर शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाऊन शिवसंवाद यात्रेद्वारे शिवसैनिकांची संवाद साधण्याचे काम सुरू केले आहे. खानदेशातील जळगाव, पारोळा, धुळे यानंतर मालेगाव येथील जाहीर सभेत आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केले आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde तसेच शिंदे गटाचे आमदार दादा भुसे MLA Dada Bhuse यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी सध्याचे मुख्यमंत्री तात्पुरते आहे, हे सरकार बेकायदेशीर आहे. बेईमानाच आणि गद्दारांच सरकार आहे. हे कोसळल्या शिवाय राहणार नाही. शिंदे आपल्या भाषणातून पन्नास थर लावून दही हंडी फोडल्याचे सांगतात होय, त्यांनी 50 तर लावले, मात्र ते पन्नास खोक्यांची दहीहंडी होती. दादा भुसे यांचे नाव न घेता इकडचे जे आमदार आहे त्यांना आपण मंत्रीपद दिलं आहे. त्यांना कृषिमंत्री केलं आता काय दिलं त्यांना तुम्हाला माहिती आहे का ? असा प्रश्न त्यांनी जनतेला विचारला आहे.

मोटरसायकल रॅलीद्वारे सभास्थळी पोहोचले यावेळी जनतेने नकारार्थी उत्तर देत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच मध्यवर्ती निवडणूक होणार त्यासाठी तुम्ही तयार रहा असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले आहे. आदित्य ठाकरे यांची 6 वाजता सभा होती. मात्र ते तब्बल साडे तीन तास उशिराने 9.30 वाजता पोहचले तरी देखील सभेला मोठी गर्दी झाली होती. मालेगाव शहरात त्यांचे आगमन होतात मोटरसायकल रॅलीद्वारे ठाकरे सभास्थळी पोहोचले. यावेळी फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली होती. त्यांच्यासाठी तब्बल एक क्विंटल फुलांचा जम्बो हार क्रेनद्वारे तर ठेवण्यात आला होता. मात्र शेतकऱ्यांवर आलेले अतिवृष्टीचे संकट यामुळे मी हा सत्कार स्वीकारणार नाही असे नम्रपणे ठाकरे यांनी सांगितले.

यावेळी मंचावर शिवसेनेचे नेते आदेश बांदेकर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख जयंत दिंडे सह संपर्कप्रमुख अल्ताफ बाबा खान ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश धात्रक आमदार नरेंद्र दराडे उपजिल्हाप्रमुख प्रमोद शुक्ला महानगरप्रमुख रामा मिस्तरी आधीच शिवसेनेचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महिला आघाडी युवासेना व शिवसेनेचे शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभा संपल्यानंतर त्यांनी समोरच असलेल्या दत्त मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यांच्या सभेने शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात निवडणुकीत याचा नक्कीच फायदा होण्याची मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचाMumbai Threat Message मुंबई उडाने की पूरी तैयारी है, धमकीच्या फोननंतर खळबळ, वाचा दिवसभरात काय घडलं

ABOUT THE AUTHOR

...view details