नाशिक- कोरोनाच्या काळात अडचणीत आलेल्या देशाला बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. यात शेतकऱ्यांसाठी 1 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. केंद्राच्या पॅकेजमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभावासह कर्जमुक्तीची अपेक्षा होती. मात्र तसे झाले नसल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नसल्याचे मत शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज वडगुले यांनी म्हटले आहे.
'केंद्राच्या पॅकेजने शेतकऱ्यांचे समाधान होणार नाही, हमीभावासह कर्जमुक्ती अपेक्षित' - हंसराज वडगुले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. यात शेतकऱ्यांसाठी 1 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या पॅकेजमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभावासह कर्जमुक्तीची अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नसल्याची खंत शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज वडगुले यांनी व्यक्त केली.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी शेतकऱ्यांसाठी 1 लाख कोटी तरतूद केल्याची घोषणा केली. यात त्यांनी 2 कोटी शेतकऱ्यांच्या कर्जाच्या व्याजावर सबसिडी आणि शेतकरी कायद्यात सुधारणा करण्याबाबत भाष केले आहे. शेतीला पूरक असलेल्या व्यवसायांना मदत करण्यसाठी योजना तयार केल्या आहेत. या सर्व गोष्टी स्वागतार्ह असल्या, तरी या पॅकेजमधून शेतकऱ्यांचे समाधान होणार नसल्याचे मत शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज वडगुले यांनी व्यक्त केले आहे.
शेतकऱ्यांना शेतात नांगर फिरवून शेतीमाल फेकून द्यावा लागत आहे. निर्यातबंदी तसेच देशांतर्गत बाजारपेठ सुरळीत नसल्याने शेतकऱ्यांना द्राक्ष देखील कवडीमोल भावात विकावे लागत आहेत. कांदा देखील मातीमोल भावात विकला जात आहे. शेतकऱ्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी त्याच्या मालाला हमीभाव देणे, नोटाबंदी, आस्मानी संकट, आर्थिक मंदीमुळे कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व्हावी तसेच पीएम किसान अनुदानाच्या रक्कमेत वाढ करणे हे या पॅकेजमध्ये होणे अपेक्षित होते. मात्र या पॅकेजमध्ये तसे काही नसल्याने शेतकऱ्यांना या पॅकेजमधून दिलासा मिळणार नाही, असे मत वडगुले यांनी व्यक्त केले आहे.