नाशिक -राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा तातडीने नाशिक दौरा रद्द केला आहे. हा दौरा रद्द करुन शरद पवार मुंबईकडे रवाना झाले आहेत. उद्या त्यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची महत्त्वाची बैठक बोलावली असून, कोरेगाव भीमा प्रकरणाच्या तपासावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी यांच्यातले मतभेदावर चर्चा होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
हेही वाचा -
केंद्र सरकारने कोरेगाव-भीमा प्रकरणाचा तपास एनाआयएकडे (राष्ट्रीय तपास संस्था) सुपूर्द केल्यानंतर राज्य आणि केंद्र असा वादाला सुरूवात झाली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंबंधी कायदेशीर बाजू पाहून न्यायालयात धाव घेणार असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतर राज्य सरकारने पुणे पोलीस तपासाठी एनआयएला मदत करतील असे सांगितले होते. त्यावरच आता शिवसेनेच्या काही नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमधले मतभेद समोर आले आहेत.
राज्यातील वकिलांच्या परिषदेच्या समारोप कार्यक्रमासाठी शरद पवार नाशिकमध्ये येणार होते. सकाळी 11 वाजता ते राष्ट्रवादी भवनात येणार होते. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीदेखील घेणार होते. त्यामुळे कार्यकर्ते मोठ्या संख्येने भवनात जमले होते. मात्र, जळगाव येथून खास हेलिकॉप्टरने ते नाशिक मध्ये आले आणि मुबंईला रवाना झाले.
हेही वाचा -