महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

छत्रपतींचा इतिहास समजावा यासाठी पुरंदरे यांनी आयुष्य खर्ची घातले - शरद पवार

शिवशाहीर बाबासाहेबांच्या निधनावर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी हाॅटेल एमराॅल्ड पार्कमध्ये शोक व्यक्त केला. महाराष्ट्राच्या नव्या पिढीला शिव छत्रपतींचा इतिहास समजावा, यासाठी राज्यभरात शेकडो व्याख्याने देणारे व त्यासाठी आयुष्य खर्ची शिवशाहीर बावासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare Passes Away) आपल्यात नाही, हे दु:खदायक आहे, या शब्दांमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी त्यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे.

sharad pawar
शरद पवार

By

Published : Nov 15, 2021, 11:11 AM IST

नाशिक -आपल्या ओजस्वी वाणीने शिवचरित्र घराघरांत पोहोचविणारे, ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाचे लेखक, ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचे लेखक-दिग्दर्शक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेयांचे आज सकाळी 5 वाजून 7 मिनिटांनी निधन झाले आहे. शिवशाहीर बाबासाहेबांच्या निधनावर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी हाॅटेल एमराॅल्ड पार्कमध्ये शोक व्यक्त केला.

शिवशाहीर बाबासाहेबांच्या निधनावर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी हाॅटेल एमराॅल्ड पार्कमध्ये शोक व्यक्त केला.

महाराष्ट्राच्या नव्या पिढीला शिव छत्रपतींचा इतिहास समजावा, यासाठी राज्यभरात शेकडो व्याख्याने देणारे व त्यासाठी आयुष्य खर्ची शिवशाहीर बावासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare Passes Away) आपल्यात नाही, हे दु:खदायक आहे, या शब्दांमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी त्यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे. वयाची शंभरी पूर्ण केल्यानंतर जाणे हे अनेकांच्या मनाला अस्वस्थ करणारे आहे. त्यांनी राजा शिवछत्रपती पुस्तकातून शिवरायाचा इतिहास महाराष्ट्रासमोर ठेवला. तो वादग्रस्त असल्याचा आक्षेप काही जणांनी घेतला. पण त्यावर बोलण्या इतका मी इतिहास अभ्यासक नाही. एक उंची गाठल्यावर संपूर्ण आयुष्य ज्या कामात घातलं. त्यांच्या बद्दल अशा बदनाम्या केल्या जातात. ते पुरंदरे यांच्या बाबतही घडलं असावं, अशी प्रतक्रिया पवार यांनी दिली आहे.

त्यांचे योगदान विसरून चालणार नाही -

बाबासाहेब पुरंदरे यांनी 100 व्या वर्षात पदार्पण केले होते. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. पुणे येथील मंगेशकर रुग्णालयात त्यांच्या उपचार सुरु होते. काल त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर उपचार सुरु होते. मात्र, आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांचे योगदान विसरून चालणार नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details