महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाशिक; १८० ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर सुरू; शरद पवारांकडून ऑनलाइन उद्घाटन - Bhujbal knowledge center covid centre

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे हॉस्पिटलचा ताण कमी करण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून या कोविड सेंटरचा पर्यायी व्यवस्था म्हणून उपयोग होणार आहे. या कोविड सेंटरमुळे कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Nashik COVID centre
नाशिक कोव्हिड सेंटर

By

Published : Apr 18, 2021, 1:00 AM IST

Updated : Apr 18, 2021, 1:07 AM IST

नाशिक - शहर आणि जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची प्रचंड संख्या लक्षात घेता शहरातील हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नाहीत. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून १८० ऑक्सिजन बेडस असलेले नाविन्यपूर्ण कोविड केअर सेंटर नाशिकमध्ये प्रथमच उभे राहिले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विभागीय क्रीडा संकुल येथील भुजबळ कोविड केअर सेंटरचे ऑनलाईन उद्घाटन केले आहे.

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे हॉस्पिटलचा ताण कमी करण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून या कोविड सेंटरचा पर्यायी व्यवस्था म्हणून उपयोग होणार आहे. या कोविड सेंटरमुळे कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

१८० ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर सुरू

या आहेत कोव्हिड सेंटरमध्ये सुविधा

  • कोविड सेंटरमध्ये १८० बेडसाठी ऑक्सिजन लाईनची स्वतंत्र जोडणी केलेली आहे. या ऑक्सिजन लाईनचे मटेरियल सुरत येथून मागवून रात्रंदिवस काम करून ऑक्सिजन लाईन उभारण्यात आली आहे.
  • ऑक्सिजन पुरवठ्यासाठी आवश्यक असलेले वेपोरायझर बडोदा, गुजरात येथून आणण्यात आले आहे.
  • ऑक्सिजन व्यवस्थेसाठी लागणारे ड्युरा सिलिंडर वेल्लूर, कर्नाटक येथून आणण्यात आले आहेत.
  • पुरेशा ऑक्सिजन साठ्यासाठी आवश्यक असलेले १ केएल क्षमतेचे ऑक्सिजन टँक पुणे येथून आणण्यात आणले आहे.
  • १८० रुग्णांना सतत पुरेल एवढा ऑक्सिजनचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे रुग्णांच्या सोयीसाठी दिल्ली येथून ५० एअर कुलर मागवून या ठिकाणी बसविण्यात आलेले आहे.
  • रुग्णांना ने-आण करण्यासाठी किंवा संदर्भित करण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
  • रुग्णांना औषध उपचारासह दोन वेळचे पौष्टिक जेवण, अंडी आणि नाश्ता,फळांचा रस,चहा, रात्रीचे हळदयुक्त दुध, शुद्ध पिण्याचे पाणी इत्यादी सोयी सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी सांगितले आहे.
  • रुग्णांच्या विरंगुळ्यासाठी वाचनालय व बुद्धिबळ, कॅरम आदी खेळ,कलाप्रेमींसाठी चित्रकलेची व्यवस्था यासह करमणुकीसाठी ३ मोठे स्क्रीन तसेच दोन दूरदर्शन संच आणि चार मोबाईल चार्जर युनिट यांसारख्या सोयी-सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.

पुरेसे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी उपलब्ध

कोविड केअर सेंटरसाठी भुजबळ नॉलेज सिटीच्या माध्यमातून प्रख्यात सर्जन डॉ. अभिनंदन जाधव यांच्यासह ५ एमबीबीएस व ४ बीएचएमएस असे १० डॉक्टर तसेच १५ प्रशिक्षित परिचारिकांची नेमणूक करण्यात आली आहे. या कोविड सेंटरसाठी एक अॅडमीन, तीन फार्मसी ऑफिसर, पाच रिसेप्शनिस्ट, १५ वार्ड बॉय, १० सिक्युरिटी गार्ड भुजबळ नॉलेज सिटीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे डॉक्टर तसेच नाशिकमधील नामांकित फिजिशियन डॉ. शितल गुप्ता आणि डॉ. अतुल वडगावकर यांचेही सहकार्य लाभणार आहे.

हेही वाचा-कसा येणार कोरोना नियंत्रणात.. ठाण्यात हळदी समारंभात चक्क बैल नाचवत पैशांची उधळण, पाहा व्हिडिओ


सामाजिक दायित्वातुन उभारलेले कोव्हिड सेंटर
हे कोविड केअर सेंटर मेट भुजबळ नॉलेज सिटी नाशिक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि नाशिक महानगरपालिका यांच्या सहकार्यातून उभारण्यात येत आहे. सामाजिक दायित्वातुन उभारलेले आणि ऑक्सिजन बेड्स असलेले हे एकमेव कोविड केअर सेंटर आहे.

हेही वाचा-पुणे : मागणी वाढल्याने ऑक्सिजनच्या दरात वाढ

रुग्णांचा मानसिक ताण कमी होण्याचीही काळजी

मोठ्या स्क्रीनवर सकाळी योगा व प्राणायामचे प्रशिक्षण देण्यात येईल. त्यानंतर मधुर संगीत, चित्रपट,सध्याच्या घडामोडी यासह सायंकाळी आयपीएल क्रिकेटच्या मॅचेस दाखविण्यात येणार आहेत. जेणेकरून रुग्णांचे मनोरंजन होऊन त्यांचा मानसिक ताण कमी होईल. तसेच आजाराची भीती दूर होण्यासाठी मदत होईल, अशी माहिती माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिली.

Last Updated : Apr 18, 2021, 1:07 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details