नाशिक - हजारो वर्षांपासून जातीपातिचा विषय आपल्या देशात आहे. शरद पवार यांनी कुठल्याही जातीवर अन्याय केला नाही. प्रत्येकाला त्यांनी न्याय दिला आहे. मोठ्या प्रमाणात विरोध असताना मराठवाडा विद्यापिठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे ही भूमिका शरद पवार यांनी घेतली होती. असे सांगत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीबाबत केलेल्या वक्तव्याशी आपण कधीही सहमत होऊ शकत नाही. तसेच, हे वाक्य खरे नाही अशी प्रतिक्रिया अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ छगन भुजबळ यांनी दिली आहे. ते येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते.
'शरद पवार आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी जातीयवाद केला नाही'
राज ठाकरे यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण वाढले, असे विधान केले होते. त्यानंतर मनसे व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये वाकयुध्द रंगले आहे. त्याबाबत विचारले असता, भुजबळांनी वरील स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान, शरद पवार आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमी वंचित घटकाना मुख्य प्रवाहात कसे आणता येईल यासाठीच प्रयत्न केलेले आहेत. त्या दोघांनीही काधीही जातीपातीचे राजकारण केलेले नाही असे मत भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केले आहे.