महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बीसीसीआयच्या एनसीए कॅम्पसाठी नाशिकच्या ईश्वरी सावकारची निवड - नाशिक क्रिक्रेटर ईश्वरी सावकार बातमी

सलामीवीर ईश्वरी सावकार ने 19 वर्षाखालील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना आंध्र विरूद्ध 86 तर चंदिगड विरूद्ध धडाकेबाज 73 धावा असे जोरदार फलंदाजीचे प्रदर्शन केल्यामुळे महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघात देखील निवड झाली होती. तसेच गेल्या वर्षी नोव्हेंबर 2021 मध्ये  जयपुर येथे खेळल्या गेलेल्या 19 वर्षाखालील  चॅलेंजर ट्रॉफी च्या स्पर्धेत ही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. ह्या सगळ्या लक्षणीय कामगिरी च्या जोरावर ईश्वरीची भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे एप्रिल महिन्यात पुदुचेरी येथे आयोजित वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेसाठी  महाराष्ट्र वरिष्ठ महिला संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सुद्धा निवड झाली होती.

selection of Ishwari Savkar from nashik for bcci nca camp
बीसीसीआयच्या एनसीए कॅम्पसाठी नाशिकच्या ईश्वरी सावकारची निवड

By

Published : May 28, 2022, 8:56 PM IST

नाशिक - शर्विन किसवे पाठोपाठ, ईश्वरी सावकारची मुलींच्या 19 वर्षांखालील वयोगटात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआय तर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमी एनसीएच्या राष्ट्रीय पातळीवरील शिबिरासाठी निवड झाली आहे. माजी कसोटीपटू व्हि व्हि एस लक्ष्मण प्रमुख असलेल्या एनसीए, बेंगळुरू तर्फे भारतभरातील उदयोन्मुख, होतकरू खेळाडूंसाठी 16 मे ते 9 जुन दरम्यान हे शिबीर होणार आहे.

धडाकेबाज फलंदाज - मुलींच्या 19 वर्षांखालील वयोगटात एकूण 5 संघ निवडले गेले असून ई संघातील ईश्वरी सावकारची राजकोट येथे होणार असलेल्या शिबीरासाठी निवड झाली आहे. ईश्वरी प्रमाणेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आणखी 5 मुलींची निवड या 19 वर्षांखालील वयोगटातील शिबीरासाठी निवड झाली आहे. सलामीवीर ईश्वरी सावकार ने 19 वर्षाखालील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना आंध्र विरूद्ध 86 तर चंदिगड विरूद्ध धडाकेबाज 73 धावा असे जोरदार फलंदाजीचे प्रदर्शन केल्यामुळे महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघात देखील निवड झाली होती. तसेच गेल्या वर्षी नोव्हेंबर 2021 मध्ये जयपुर येथे खेळल्या गेलेल्या 19 वर्षाखालील चॅलेंजर ट्रॉफी च्या स्पर्धेत ही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. ह्या सगळ्या लक्षणीय कामगिरी च्या जोरावर ईश्वरीची भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे एप्रिल महिन्यात पुदुचेरी येथे आयोजित वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र वरिष्ठ महिला संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सुद्धा निवड झाली होती.
या महत्वाच्या शिबिरासाठी झालेल्या निवडीबद्दल,नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ईश्वरीचे खास अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details