येवला ( नाशिक) - नवीन शैक्षणिक वर्षाला १३ जूनपासून प्रारंभ होणार असल्याने शैक्षणिक साहित्याची बाजारपेठ सजली आहे. यंदा शैक्षणिक साहित्याच्या किंमतीत 30 ते 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे पालकांच्या खिशाला भुर्दंड बसणार आहे.
शालेय साहित्य किंमतीत वाढ -कोरोनामुळे दोन वर्षे दप्तर, पाटी, पुस्तक, गणवेश व अन्य साहित्याची विक्री झाली नाही. इंधन दरवाढ, मजुरी वाढ,वाहतूक खर्च, पेपरच्या वाढलेल्या किंमतीमुळे शैक्षणिक साहित्य महागले आहे. वह्यांच्या किंमतीत मागील दोन वर्षांच्या तुलनेत अधिक आहे. गेल्या वर्षी 300 रुपये डझन असणाऱ्या वह्या आता 400 ते 450 रुपयांवर गेल्या आहेत. तसेच पाच रुपयांना मिळणारा साधा पेन आता सात रुपयांना मिळत आहेत. दुसरीकडे पालक जुन्या दराप्रमाणे मागणी करत असल्याचे शालेय साहित्य विक्रेत्यांचे म्हणणे आहे.