महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाशिककरांचे हक्काचे पर्यटनस्थळ सापुतारा बंद; उद्योजकांवर आर्थिक तर स्थानिकांवर बेरोजगारीचं संकट - saputara nashik news

सापुतारा पर्यटनस्थळाला लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. मागील ४८ दिवसात सापुतारा पुर्णतः बंद असल्याने हॉटेल व्यवसायिकांसह पर्यटनावर अवलंबुन असणाऱ्या २० ते २५ व्यवसायिकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

सापुतारा पर्यटन स्थळ नाशिक
सापुतारा पर्यटन स्थळ नाशिक

By

Published : May 13, 2020, 4:49 PM IST

Updated : May 13, 2020, 7:23 PM IST

नाशिक - जिल्हावासियांचे हक्काचे पर्यटनस्थळ म्हणून सापुतारा पर्यटनस्थळाची ओळख आहे. मात्र, या पर्यटनस्थळाला लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर असलेले सापुतारा पर्यटन स्थळ लॉकडाऊनमुळे मागील 48 दिवसापासून बंद आहे. या बंदमुळे सापुतारामधील हॉटेल व्यावसायिकांसह सापुतारा पर्यटनस्थळावर अवलंबून असणाऱ्या इतर वीस ते पंचवीस व्यवसायिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. हॉर्स रायडिंग, पॅराग्लायडिंग, एडव्हेंचर पार्क अशा पर्यटनाच्या असंख्य सुविधा देणाऱ्या व्यवसायिकांबरोबरच रानमेवा, स्ट्रॉबेरी अशा स्थानिकांना रोजगार देणाऱ्या सर्वच घटकांना या लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे.

सापुतारा पर्यटन स्थळ बंद झाल्याने व्यवसायिक आणि ग्रामस्थांचे मोठे आर्थिक नुकसान...

हेही वाचा...संघर्ष जगण्यासाठीचा : कुटुंबाचा भार खांद्यावर घेत ओढतोय 'गाडा', सांगा कसं जगायचं...?

सापुताऱ्यामध्ये 50 हून अधिक छोटे-मोठे हॉटेल असून या हॉटेलमध्ये काम करणारे सर्व कामगार हे नाशिक जिल्ह्याच्या कळवण, पेठ, वणी या आदिवासी बहुल भागातील नागरिक आहे. त्यामुळे या लॉकडाऊन काळात हॉटेल व्यसायिकांबरोबरच स्थानिकांच्या रोजगारालादेखील मोठा फटका बसला आहे. सापुताऱ्यात प्रतिदिन १ ते २ कोटी रुपयांची उलाढाल होत असते. मात्र, या लॉकडाऊनमुळे ही सर्व उलाढाल ठप्प झाल्याने एकट्या सापुताऱ्याला ७० ते ८० कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

सापुताऱ्यामध्ये आदिवासी कलाग्राम, लेक गार्डन, रोज गार्डन, स्टेफ गार्डन यांसह सनराईज आणि सनसेट पॉईंट हे पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण आहे. या ठिकाणांना भेट देण्यासाठी देशभरातील लाखो पर्यटक सापुताऱ्याला येत असतात. मात्र, ऐन उन्हाळ्यात लॉकडाऊन झाल्याने सापुताऱ्यातील हे सर्व व्यवसाय ठप्प झाले. त्यामुळे येथील व्यावसायिकाबरोबर स्थानिकांचे मोठ नुकसान झाल आहे. त्यामुळे आता या व्यावसायिकांना आणि स्थानिकांना पुन्हा उभारी घेण्यासाठी सरकारच्या मदतीची अपेक्षा आहे.

हेही वाचा...कोरोनाच्या संकट काळातून आत्मविश्वास व कृतीतून बाहेर पडू शकतो : नितीन गडकरी

Last Updated : May 13, 2020, 7:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details