नाशिक : शिंदे फडणवीस सरकार संपूर्णत: बेकायदेशीर आहे. आम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी तारीख दिलेली नव्हती. हे सरकार झुंडशाहीमधून स्थापन झालेले आहे. राज्यपाल हे स्वतंत्र आणि घटनेचे पालन करणारे नाहीत, अशी टीका शिवसेनेचे नेते संजय राऊत ( Sanjay Raut React on Devendra Fadnavis Gov ) यांनी केली. ते माध्यमांशी बोलत होते.
आमची भूमिका सावधगिरीची : खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut Slammed BJP ) म्हणाले, की सगळ्या आमदारांची मुले ही युवासेनेचे पदाधिकारी होते. त्यांच्याकडे निर्णयक्षमता आहे. विधानसभेचे अध्यक्ष हेदेखील शिवसेनेचे आहेत. भाजपला आमच्याविरोधात लढण्यासाठी शिवसेनेचे नेते हवे आहेत. आमच्याच लोकांचा रक्तपात होणार आहे. त्यामुळे आमची सावधगिरीची भूमिका आहे.
राज्यपाल घटनेचे पालन करणारे नाहीत :नाशिक दौऱ्यावर असताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना, राज्यपालांवर सडकून टीका केली. तसेच, राज्यपालांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवला. विधान परिषदेची निवडणूक घ्यावी त्यासाठी आम्हाला तारीख द्यावी, असे अनेकदा आम्ही सांगत होतो. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, हे सरकार येताच 24 तासांत त्यांनी तारीख दिली. त्यामुळे राज्यपाल हे स्वतंत्र वृत्तीचे आणि घटनेचे पालन करणारे नाहीत. हे सर्वांचे मतं आहे, असेही खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
हे सरकारच पूर्ण बेकायदेशीर : हे सरकार पूर्णपणे बेकायदेशीर आहे. आमदारांच्या अपात्रतेची याचिका न्यायालयात प्रलंबित असताना बहुमताचा ठराव राज्यपाल कोश्यारी यांनी घ्यायला लावणे हे बेकायदेशीर आहे. तसेच आम्ही विधिमंडळ गट नेता यावर नोंदवलेला आक्षेप हे सर्व न्यायालयात प्रलंबित असताना बहुमताचा ठराव घेणे हे लोकशाहीचा खून आहे. असेही संजय राऊत म्हणाले.