नाशिक -रामनवमीला दहा राज्यात दंगली ( Hindu Muslim Riot In India ) झाल्या. या पूर्वी रामनवमीला कधी दंगली झाल्या नव्हत्या. कोल्हापूर प्रचार ( Kolhapur By Election ) शिगेला पोहचला, तेंव्हाच भोंगे, हनुमान चालिसा ( Hanuman Chalisa ) हे घाणेरडं राजकारण सुरू करुन तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा कोणताही फायदा झाला नाही. राज्यात दंगली घडवायच्या आणि निवडणुका जिंकायच्या, असे कटकारस्थान सुरु असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय राऊत ( Sanjay Raut Criticized Bjp ) यांनी भाजपावर केला. तसेच ज्यांनी भाड्याने हिंदुत्व स्वीकारलं त्यांनी आम्हाला शिकवू नये, असा टोलाही त्यांनी मनसेला ( Sanjay Raut Criticized MNS ) लगावला. नाशिक दौर्याच्या दुसर्या ( Sanjay Raut In Nashik ) दिवशी शनिवारी हाॅटेल 'एक्सप्रेस इन' येथे पत्रकार परिषद घेत संजय राऊत ( Sanjay Raut PC In Nashik ) यांनी मनसेवर हल्लाबोल केला. हिजाब मुद्दा संपल्यावर भोंग्याचे मुद्दा काढला. शिवसेनेने सन १९८७ साली विले पार्ले पोटनिवडणुकीत हिंदुत्वाची घोषणा केली. त्याचाच कॉपी करण्याचा पर्यंत केला, अशी टीका ही संजय राऊत यांनी केली.
'भोंग्याच राजकारण संपल आहे' -ज्यांनी भाड्याने हिंदुत्व स्विकारलं, त्यांनी आम्हाला शिकवू नये, असा टोला त्यांनी मनसेला लगावला. हिजाब मुद्दा संपल्यावर भोंग्याचे मुद्दे काढले आहेत. भक्त असाल तर पुस्तकात डोकं घालून हनुमान चालीसा पठन करु नका. एवढेच आपण हनुमानाचे भक्त असाल, तर हनुमान चालीसा तोंडी पाठ असायला पाहिजे होती, असा टोलाही त्यांनी मनसेला लगावला.