नाशिक - मी जरी वंशज असलो तरी मंत्री छगन भुजबळ यांनी शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा समर्थपणे चालविला आहे. ते त्यांच्या विचारांचे वारसदार असल्याचे मत खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केले. तर बहुजन समाजाच्या प्रश्नांसाठी आम्ही एकमेकांना ताकद देऊ, अशी ग्वाही मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिली. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नाशिक येथे मंत्री छगन भुजबळ ( Chagan Bhujbal Chatrapati Bhosale meet ) यांची सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
खासदार संभाजीराजे छत्रपती ( MP Sambhaji Raje Chhatrapati ) म्हणाले, की छत्रपती शाहू महाराज यांनी पहिल्यांदा देशात अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसींना आरक्षण दिले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेची ( Babasaheb Ambedkar constitution ) निर्मिती करून आरक्षण दिले आहे. छत्रपती शाहू महाराज यांनी ( Chhatrapati Shahu Maharaj work ) बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम केले आहे. मी त्यांचा वंशज आहे. त्यांनी केलेले काम पुढे अविरत सुरू ठेऊन बहुजन समाजाला एकत्र ठेवण्याचे माझे प्रयत्न आहेत.
संभाजीराजे आणि छगन भुजबळ यांच्यात बंद दाराआड तब्बल एक तास चर्चा-न्यायालयात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा संघर्ष सुरू असताना आज मराठा आरक्षणाच्या लढ्याचs नेतृत्व करणारे संभाजी राजे छत्रपती आणि ओबीसी आरक्षणासाठी लढा देणारे ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यात बंद दाराआड तब्बल एक तास चर्चा झाली. या चर्चेत नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा झाली, हे समोर आले नाही. मात्र या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मराठा समजतील काही नेते ओबीसीमधून आरक्षण मागत असल्याने त्याला भुजबळांनी वेळोवेळी विरोध केला. अशातच भुजबळांची संभाजीराजेंनी भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
छत्रपती शाहू महाराज आणि नाशिकचा जुना संबंध-नाशिक येथे झालेल्या मराठा आरक्षणाच्या मूक आंदोलनाच्या माध्यमातून मंत्री छगन भुजबळ यांची भेट झाली होती. त्यावेळी घरी येणार असs मी त्यांना सांगितलं होत. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून भेट झाली नाही. आज नाशिक येथे कार्यक्रमानिमित्त आलो असता त्यांची भेट घेतली. छत्रपती शाहू महाराज आणि नाशिकचा जुना संबंध आहे. नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेला त्यांनी मोठी मदत केली होती. तसेच पिंपळगाव बसवंत येथील सत्यशोधक चळवळीत काम करणारे सत्यशोधक गणपतराव मोरे यांना त्यांच्या कामाबद्दल अधिक बळ दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
भेटीत बहुजन समाजाला न्याय मिळण्यासाठी प्रामुख्याने चर्चा - छत्रपती शाहू महाराज यांच्या ६ मे रोजी असलेल्या स्मृती शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाबद्दल आमची चर्चा झाली आहे. या निमित्ताने छत्रपती शाहू महाराज यांचे विचार जगभरात पोहचविण्यासाठी ही संधी असून त्यादृष्टीने आमच्याकडून संयुक्तपणे प्रयत्न करण्यात येणार आहेत. या भेटीत बहुजन समाजाला न्याय मिळण्यासाठी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. मंत्री छगन भुजबळ हे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने छत्रपती शाहू महाराजांचे विचार तळागाळातील नागरिकांमध्ये रुजविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मी जरी छत्रपती शाहू महाराज यांचा वंशज असलो तरी मंत्री छगन भुजबळ छत्रपती शाहू महाराज यांचे विचार पहिल्यापासूनच समाजात रुजवीत आहेत. ते त्यांच्या विचारांचे खरे वारसदार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, मराठा आणि ओबीसी हा कुठलाही वाद नाही बहुजन समाजासाठी आपला लढा आहे. फार थोडे लोक असा वाद करतात त्याला आपला विरोध आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर आपण सर्वांनी एकत्रित आल्यावर आपल्याला न्याय मिळणार आहे. त्यामुळे बहुजन समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र ठेवण्याचा माझा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.