नाशिक - हरिद्वारमध्ये होत असलेल्या कुंभमेळ्यात नाशिक जिल्ह्यातून 500 साधूसंत सहभागी होणार असल्याची माहिती महंत श्री मंडलाचार्य अनिकेत शास्त्री देशपांडे महाराज यांनी दिली आहे. तसेच येथील प्रशासनाने शिस्तीचा अतिरेक करू, नये असं म्हणत कुंभमेळ्याला गालबोट लागणार नाही. याची काळजी देखील प्रशासनाने घ्यावी अस महंत देशपांडे यांनी ईटीव्ही भारतशी बोलतांना म्हटलं आहे.
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे मार्गदर्शन तत्वे जारी-
कोरोना काळातही हरिद्वारमध्ये कुंभमेळा होत असून 1 एप्रिलपासून 28 दिवसांच्या कालावधीसाठी हा कुंभमेळा भरणार आहे. कोरोनामुळे कालावधी कमी करण्यात आला असून यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांनी मार्गदर्शन तत्वे जारी केले. त्यासाठी प्रमाणित संचालन संशोधन पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. या कुंभमेळ्यात 10 प्रमुख आखड्यांचे 1 लाख साधू महंत सहभागी होणार असून कुंभमेळ्यास येणाऱ्या प्रत्येक साधू महंत आणि भक्तगन यांना आरटीपीसीआर चाचणी नकरात्मक असल्याचा अहवाल असणे बंधनकारक आहे. ही चाचणी येण्याच्या 72 तास आधी केली असणं ही बंधनकारक असून जे भक्तगण नियमांचे पालन करणार नाहीत, अशा विरोधात कारवाई केली जाणार आहे.
तसेच वैद्यकीय तंदुरुस्ती प्रमाणपत्र, इ-पास, इ परमिट आवश्यक आहे. भक्तगणांना कुंभमेळा वेब पोर्टलवर नोंदणी करावी लागणार असल्याचे मुख्य सचिव प्रकाश यांनी म्हटले आहे.
प्रत्येक व्यक्तीत 6 फुटाचे अंतर-
कोरोना काळात भक्तगणांनी सामाजिक अंतराचा निकष पाळणे गरजेचे असून दोन व्यक्तीत सहा फुटाचे अंतर गरजेचे आहे. तसेच प्रत्येकाने मास्क वापरणे ही आवश्यक करण्यात आला आहे. या कुंभमेळ्यामध्ये आतंरराष्ट्रीय पातळीवरून देखील भक्तगण सहभागी होणार असून त्यांना देखील हे नियम लागू असणार आहेत.
आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण-
कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लाखोंच्या संख्येने येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून राज्य आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी व कुंभमेळा ठिकाणी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांचे आधीच लसीकरण केले जाणार आहे.
सरकारने शिस्तीचा अतिरेक करू नये-