महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कृषी कायद्याच्या समर्थनार्थ सदाभाऊ खोत मैदानात ; 6 डिसेंबरला मुंबईत आंदोलन

कृषी कायद्यातील तरतुदींमुळे शेतकरी पारतंत्र्यातून मुक्त होणार असून प्रत्येक शेतकऱ्याला त्यांचा शेतमाल कोणालाही, कुठेही विकण्याचा अधिकार असेल, असे माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले. त्यामुळे या कायद्याच्या समर्थनार्थ रयत क्रांती संघटना 6 डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

sadabhau khot on farmer law
कृषी कायद्याच्या समर्थनार्थ सदाभाऊ खोत मैदानात ; 6 डिसेंबरला आझाद मैदानावर आंदोलन

By

Published : Dec 4, 2020, 4:19 PM IST

नाशिक - कृषी कायद्यातील तरतुदींमुळे शेतकरी पारतंत्र्यातून मुक्त होणार असून प्रत्येक शेतकऱ्याला त्यांचा शेतमाल कोणालाही, कुठेही विकण्याचा अधिकार असेल, असे माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले. इतर राजकीय पक्ष शेतकर्‍यांची दिशाभूल करत असल्याने दिल्लीत आंदोलन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या कायद्याच्या समर्थनार्थ रयत क्रांती संघटना 6 डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

कृषी कायद्याच्या समर्थनार्थ सदाभाऊ खोत मैदानात ; 6 डिसेंबरला आझाद मैदानावर आंदोलन

शासकीय विश्रामगृहात त्यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला. केंद्र आणि राज्य सरकारने मंजूर बिलांची तत्काळ अंमलबजावणी करावी. शेतमाल विकण्याची स्वतंत्र व्यवस्था उभारली जाऊ नये, यामध्ये काही राजकारण्यांचा स्वार्थ आहे. पंजाबमध्ये हमीभावावर होणारी खरेदीची सर्व रक्कम केंद्र सरकार राज्य सरकारला देते. या मालात हेराफेरी करून राजकारणी मलिदा कमवतात. या कृषी कायद्याने ही दलाली बंद होणार म्हणून विरोध केला जात असल्याचा आरोप खोत यांनी केला. 'स्पर्धा वाढली, तर शेतकऱ्यांचा फायदा वाढेल', असे ते म्हणाले.

राजू शेट्टींवर टिकास्त्र

राजू शेट्टी यांनी भाजीपाला नियमन मुक्ती,अडत बंदीला पाठिंबा दिला. आता बाजू बदलल्यानं विरोध करत आहेत. कोणी काय भूमिका घ्यावी, हा त्याचा प्रश्न. शरद जोशी यांना अभिप्रेत हा कृषी कायदा असल्यानं आमचा फायदा आहे. मूठभर मार्केट कमिटी आणि दलालांसाठी बांडगूळं म्हणून काम करणारे विरोध करतायेत, असा टोला त्यांनी लगावला.

मका,कापूस खरेदी केंद्र सुरू

पंजाबमध्ये तांदूळ खरेदी केंद्र सुरू झाले. खरेदीसाठी स्पर्धा वाढली, तर फायदा शेतकऱ्यांचाच आहे. देशात हमीभावानं फक्त 6 टक्के शेतमाल खरेदी होतो. नवा कायदा कायम राहणार हे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. मात्र, त्यानंतर आता फक्त राजकारण सुरू आहे.

पदवीधर मतदारसंघ निवडणूक : "पराभवावर चिंतन करणार"

विधान परिषदेच्या निकालावर आत्मचिंतन करणार असल्याचे खोत म्हणाले. याचा परिणाम इतर निवडणुकांवर होईल असं मला वाटत नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details