नाशिक शहरातील व्यावसायिक, विक्रेत्यांची होणार आरटीपीसीआर चाचणी, मनपाने ३० पथकांची नेमणूक केली - नाशिकमध्ये आरटीपीसीआर चाचणी,
नाशिकमध्ये व्यवसायिक व विक्रेत्यांची कोविड-19 ची आरटीपीसी चाचणी करण्यासाठी महानगरपालिके कडून ३० पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी महानगर पालिकेच्या वतीने हे पाऊल उचलल्याचे वैद्यकीय अधिकरी डॉ बापूसाहेब नागरगोजे यांनी सांगितलं आहे.
नाशिक - महानगरपालिकेच्या वतीने शहर व परिसरात असणाऱ्या व्यवसायिक व विक्रेत्यांची कोविड-19 ची आरटीपीसी चाचणी करण्यासाठी महानगरपालिके कडून ३० पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. शहरात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महानगरपालिके कडून प्रयत्न केले जात आहे.
नाशिक शहरात गेल्या १५ दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले असून दररोज बाराशे ते तेराशे नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. शहर व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या अनुषंगाने विविध पातळ्यांवर जिल्हा प्रशासन व महानगर पालिकेच्या वतीने प्रयत्न केले जात आहे. याच अनुषंगाने नाशिक शहरातील विविध किराणा दुकानदार, फळविक्रेते, भाजीविक्रेते, औषध विक्रेते, हातगाडी वरील विक्रेते, सलून चालक, रिक्षा चालक आदींचा अनेक लोकांशी दररोज संपर्क येत असतो. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता अधिक असल्याने हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ह्या सर्व घटकांची आरटीपीसीआर चाचणी केली जाणार असून यासाठी महानगरपालिकेच्या वतीने ३० आरोग्य पथकांची नेमणूक केली जाणार असल्याचे वैद्यकीय अधिकरी डॉ बापूसाहेब नागरगोजे यांनी सांगितलं आहे.
#नाशिक जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती
-आता पर्यंत मिळवून आलेले पॉझिटिव्ह रुग्ण-१ लाख ३४ हजार ९६६
-आतापर्यंत कोरोना मुक्त व्यक्ती-१ लाख २३ हजार ९२३
-एकूण मृत्यू- २ हजार १७६
-जिल्ह्यात उपचार घेत असलेले रुग्ण-८ हजार ८६७
-कोरोना मुक्त होण्याची टक्केवारी-९१.८२
हेही वाचा - 13 वर्षाच्या मुलीला गर्भपातासाठी परवानगी नाही - मुंबई उच्च न्यायालय