नाशिक - नाशिकच्या सिडकोतील उत्तम नगर भागात सामाजिक कार्यकर्ते तसेच आरपीआय पक्षाचे पदाधिकारी प्रशांत जाधव यांच्यावर सोमवारी (दि. 14 फेफ्रुवारी)रोजी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. यात जाधव यांच्या मांडीला दोन गोळ्या लागल्याने ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेत असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
डाव्या पायाला गोळी लागली
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सामजिक कार्यकर्ते प्रशांत जाधव हे सोमवारी रात्री घरी जात असताना सिडकोतील उपेंद्रनगर येथे यांच्या घराजवळच बारा वाजेच्या सुमारास एका दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने जाधव यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या त्यामध्ये जाधव यांच्या डाव्या पायाला गोळी लागली. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोरांनी यांनी पलायन केले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जवळच असलेल्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.