नाशिक नाशिक शहरात अनेक मंदिरे आहेत. तेथे कुंभमेळासुद्धा भरला जातो. नाशिक शहराची ओळख तीर्थक्षेत्र म्हणून असल्याने तेथे साधु संताचा वावर असतो. परंतु, आता साधुपणाला बदनाम करणारी घटना Beware of Hypocrites नाशिक शहरात घडली आहे. नाशिक शहरात Naga Sadhu of Nashik सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या एकट्या इसमांना फिरून पत्ता विचारण्याच्या बहाण्याने नागा साधू Robebry from a Naga Sadhu in Nashik व त्याच्या सहकाऱ्यांनी लुटल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागा साधूकडून लूटीचे दोन प्रकार शहरात घडल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आहे.
माॅर्निंग वाॅकला जाणाऱ्या नागरिकांना गाठून लूट मिळालेल्या माहितीनुसार, पांढऱ्या रंगाच्या कारमधून नागा साधू तसेच त्याच्यासोबत एक महिला व इतर दोन सहकारी यांनी 25 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास पेठ रोडवरील किशोर सूर्यवंशी मार्ग या भागात मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या भागीरथ शेलार यांना गाठले. त्यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवल्यानंतर, कारमधून नागा साधूने बाहेर पडून त्यांना रुद्राक्ष व आशीर्वाद दिला. हे करीत असताना शेलार त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास करीत आपल्या साथीदारांसह पोबारा केला.