नाशिक - पिंपळगाव टोलनाका परिसरातील नदीच्या पुलावरून उडी मारण्याच्या तयारीत असलेल्या एका युवकाला वाचविण्यात स्थानिक युवकांना यश आले. कौटुंबिक कारणातून 27 वर्ष राकेश अहिरे हा कादवा नदीच्या पुलावर उभा राहून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत ( preparing to commit suicide attempt ) होता. यावेळी पुलावरून जाणाऱ्या दोघा तरुणांनी दुचाकी थांबवत मोठ्या शिताफीने आत्महत्येचे तयारीत असणारे या तरुणाला वाचवले ( rescued young man who Commits Suicide ) आहे. अजय जाधव आणि नाजिम अत्तर यांनी पुलावरून उडी मारण्याच्या तयारीत असणाऱ्या तरुणाला सुरक्षित रित्या बाहेर काढत त्याला आत्महत्या करण्यापासून रोखला आहे.
घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल -
पिंपळगाव बसवंत परिसरात राहणाऱ्या एका 27 वर्षीय युवकाने कौटुंबिक वादातून दि.16 मार्च दुपारच्या सुमारास टोल नाक्या परिसरात असलेल्या कादवा नदीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र पुलावरून जाणाऱ्या दोघा तरुणांनी दुचाकी थांबवत मोठ्या शिताफीने आत्महत्येचे तयारीत असणारे या तरुणाला वाचवले आहे. ही घटना पिंपळगाव बसवंत परिसरात घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.