महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोना रुग्ण दगावल्याने नातेवाईकांनी केली नाशिकमधील रेडियंट हॉस्पिटलची तोडफोड - Relatives vandalize Radiant Hospita

रुग्ण दगावल्याने रुग्णालय प्रशासनाने योग्य उपचार न केल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केल्याचा संतापजनक प्रकार नाशिकच्या अशोका मार्ग परिसरात असलेल्या रेडियंट हॉस्पिटलमध्ये घडला आहे.

रुग्णालय तोडफोड
रुग्णालय तोडफोड

By

Published : Apr 29, 2021, 2:14 PM IST

नाशिक : रुग्ण दगावल्याने रुग्णालय प्रशासनाने योग्य उपचार न केल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केल्याचा संतापजनक प्रकार नाशिकच्या अशोका मार्ग परिसरात असलेल्या रेडियंट हॉस्पिटलमध्ये घडला आहे. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना दमदाटी करत केली शिवीगाळ


रुग्ण दगावल्याने डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी रुग्णालयाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. नाशिकच्या अशोका मार्ग परिसरात असलेल्या रेडियंट हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या पोपट गोतिसे यांचा बुधवारी रात्री प्रकृती खालावल्याने त्यांचा मृत्यू झाला. यावेळी रुग्णालयाने योग्य उपचार न केल्याचा आरोप करत त्यांचे नातेवाईक राम गोतिसे आणि श्याम गोतिसे यांनी हॉस्पिटलमध्ये येऊन रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना दमदाटी करत शिवीगाळ केली. याचबरोबर रुगणालायची तोडफोड देखील केली आहे.

गेल्या तीन दिवसात शहरातील वेगवेगळ्या तीन रुग्णालयात नातेवाईकांनी केली तोडफोड

यावेळी रुग्णालयातील आयसीयूची काच रुग्णालय कर्मचाऱ्याला लागल्यानं जखमी झाला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. रुग्णालय प्रशासनाच्या तक्रारीवरून दोघा संशयितांना उपनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गेल्या तीन दिवसातील डॉक्‍टर वरती होत असलेल्या हल्ला आणि रुग्णालय तोडफोडीची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी सातपूर येथील रुग्णालयात डॉक्टरांवर हल्ला करण्यात आला होता तर रुग्णाला घरी बघायला न आल्यामुळे इंदिरानगर येथे देखील डॉक्टरवर हल्ला करत त्यांच्या पत्नीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली होती तर दोन दिवसांपूर्वी मुंबई नाका येथील मानवता रुग्णालयात देखील रुग्ण दगावल्यामुळे तोडफोड करत डॉक्टरांवर हल्ला करण्यात आला होता. त्या पाठोपाठ पुन्हा एकदा घटनेची पुनरावृत्ती झाल्याने शहरातील डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झाले. यामुळे आता यावर पोलिसांनी ठोस कारवाई करत या घटना रोखण्यासाठी उपाययोजना कराव्या अशी मागणी जोर धरत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details