नाशिक -नाशिकमध्ये एका कोरोनाबाधित रुग्णाचा रुग्णवाहिकेत मृत्यू झाल्यानंतर मृतदेह रुग्णवाहिकेतच ठेऊन नातेवाईक जिल्हा शासकीय रुग्णालयातून पसार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत सरकारवाडा पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाच्या आवारात मन हेलावून टाकणारी घटना घडली. पाथर्डी फाटा परिसरात राहणाऱ्या एका कोरोनाबाधित व्यक्तीची तब्बेत बिघडली म्हणून त्याला नातेवाईक रुग्णाला घेऊन जिल्हा रुग्णालयात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच या रुग्णाचा रुग्णालयाच्या आवारातच मृत्यू झाला. यानंतर नातेवाईकांनी रुग्णवाहिका चालकालाच अंत्यसंस्कार करण्यास सांगून नातेवाईक तेथून फरार झाले. या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयाच्या आवारात असलेल्या पोलीस चौकीत रुग्णवाहिका चालकाने माहिती दिली. पोलिसांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेत नातेवाइकांचा शोध सुरू केला आहे.
येथे माणूसकी ओशाळली.. कोरोनाबाधित व्यक्तीचा मृतदेह रुग्णवाहिकेत ठेऊन नातेवाईक पसार
नाशिकमध्ये एका कोरोनाबाधित रुग्णाचा रुग्णवाहिकेत मृत्यू झाल्यानंतर मृतदेह रुग्णवाहिकेतच ठेऊन नातेवाईक जिल्हा शासकीय रुग्णालयातून पसार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
civil hospital dead body issue
कोरोनाची भीती -
कोरोनाची भीती अजूनही कायम असून घरातील एखादा व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर नातेवाईक देखील त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी पुढे येत नाहीत, अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. स्मशानभूमीत देखील नातेवाईक अंत्यसंस्कार करते वेळी मदत करत नाहीत, अशी खंत स्मशानभूमीत काम करणाऱ्या व्यक्तींनी व्यक्त केली आहे. एकूणच काय तर कोरोनामुळे कुटुंबातील लोक सुद्धा परके होतात हे दिसून आले आहे.
Last Updated : May 21, 2021, 4:20 PM IST