नाशिक : लष्करी हद्दीत पुन्हा ड्रोनने घिरट्या (Drone Reiki Nashik) घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आहे; या बाबत कोणी ड्रोनच्या सह्याने लष्कर परिसराची रेकी (Nashik Military Premises Reiki) करतंय का असा प्रश्न उपस्थित होत असून आडगाव पोलीस ठाण्यात (Adgaon Police Station) याबाबत अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Military Premises Drone Reiki Nashik : नाशिकच्या लष्करी हद्दीत ड्रोनच्या सहाय्याने रेकीचा प्रयत्न; पोलीस विभाग अलर्ट - drones in Nashik military area
नाशिक : लष्करी हद्दीत पुन्हा ड्रोनने घिरट्या (Drone Reiki Nashik) घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आहे; या बाबत कोणी ड्रोनच्या सह्याने लष्कर परिसराची रेकी (Nashik Military Premises Reiki) करतंय का असा प्रश्न उपस्थित होत असून आडगाव पोलीस ठाण्यात (Adgaon Police Station) याबाबत अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'नो ड्रोन झोन' परिसरात रेकीचा प्रयत्न -नाशिकच्या सैनिकी क्षेत्राच्या हवाई हद्दीत ड्रोन उडवण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. सैनिकी क्षेत्राच्या हवाई हद्दीत 'नो ड्रोन झोन' असूनही शुक्रवारी रात्री 10 30 वाजेच्या सुमारास 2 ते 3 मिनिटं ड्रोन उडवल्याचं प्रकार समोर आला आहे. आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या डीआरडीओ कार्यालयाच्या भिंती जवळ 24 सप्टेंबर रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास ड्रोन उडविला गेला. मागील महिन्यात 28 ऑगस्ट रोजी अशाच प्रकारे ड्रोन उडवण्यात आल्यानं महिन्याभरात ही दुसरी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे या बाबत आडगाव पोलीस ठाण्यात विमान अधिनियम 1934 चे कलम 11 प्रमाणे अज्ञात व्यक्ती विरोध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.