नाशिक - वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावात खासगी रुग्णवाहिका रुग्णांची लूट करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण आहेत.
जिल्ह्यातील प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत नाशकात 49 हजार जणांना कोरोनाची लागण झाली असून 1 हजार 29 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच रोज कोरोनाचे हजारो नवीन रुग्ण सापडत आहेत. अनलॉकमध्ये नागरिक देखील कामधंद्यासाठी घराबाहेर पडत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील सरकारी तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये देखील रुग्णांसाठी जागा नाही. सद्यस्थितीत 9 हजार 521 कोरोनाबाधित रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. कुठे बेड्स मिळत नाहीत, कुठे ऑक्सिजन पुरत नाही, तर कुठे रुग्णांना दाखल करुन घेण्यात येत नाहीय. अशा परिस्थितीत रुग्णवाहिकांनी देखील त्यांचे दर वाढवल्याचे चित्र आहे.
खासगी रुग्णवाहिका देखील रुग्णांकडून एक हजार ते 1 हजार 500 रुपये भाडे आकारत रुग्णांची लूट करत आहेत. परिवहन विभागाकडून रुग्णवाहिकांसाठी दर ठरवून दिल्यानंतरही ज्यादा दर आकारण्यात येत आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी सर्वसामान्य करत आहेत.
नाशिक जिल्ह्यात एकूण 547 रुग्णवाहिका आहेत. यात नाशिक महानगरपालिकेच्या 20 रुग्णवाहिका असून कोविड काळात 15 खासगी रुग्णवाहिका भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या. तर जिल्हा आरोग्य विभागाकडे 20 रुग्णवाहिका असून महामारीच्या काळात 108 क्रमांकाच्या 15 रुग्णवाहिका कार्यरत आहेत.
रुग्णवाहिकेसाठी आरटीओने ठरवून दिलेले दर