महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

भगूर भागातील दुभाजकावर आढळला शॅमेलिऑन जातीचा दुर्मीळ सरडा - नाशिक दुर्मीळ शॅमेलिऑन सरडा न्यूज

वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन सरड्याला ताब्यात घेतले. वनरक्षक विजय पाटील व वन मजूर यांच्यासह प्राणीमित्र रोहन जगताप,आशिष पवार,मंगेश परदेशी यांनी या सरड्याला नैसर्गिक अधिवासात सोडले.

शॅमेलिऑन जातीचा दुर्मिळ सरडा
शॅमेलिऑन जातीचा दुर्मिळ सरडा

By

Published : Sep 30, 2020, 12:21 PM IST

नाशिक -भगूर पोलीस चौकी जवळील रस्त्याच्या दुभाजकावर शॅमेलिऑन जातीचा सरडा आढळला असून या सरड्याला बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. या भागात सरडा आढळल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी वन विभागाला दिली.

वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन सरड्याला ताब्यात घेतले. वनरक्षक विजय पाटील व वन मजूर यांच्या सह प्राणीमित्र रोहन जगताप,आशिष पवार,मंगेश परदेशी यांनी ह्या सरड्याला नैसर्गिक अधिवासात सोडले.

भगूर भागातील दुभाजकावर आढळला शॅमेलिऑन जातीचा दुर्मिळ सरडा
दुर्मीळ अशा शॅमेलिऑन सरड्याचे पाय पक्ष्यांप्रमाणे, तर जीभ इतर सामान्य सरड्यांहून अधिक लांब असते. शॅमेलिऑन जातीचा सरडा हा उष्ण प्रदेशात आढळतो. त्याच्या विविध जाती आफ्रिका खंड, दक्षिण आशिया, स्पेन, पोर्तुगल या भागांत आढळतात.

ABOUT THE AUTHOR

...view details