महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पैशांच्या पावसाचे आमिष दाखवणाऱ्या बलात्कारी बाबाला भिवंडीत अटक - RAPIST ARRASTED AT BHIVANDI

भोंदू विनोदबाबा उर्फ तुकाराम हिरे विरोधात गंगापूर पोलिसात एका महिलेला पैशाच्या पावसाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार दाखल झाली होती. त्यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नाशिक पोलीस

By

Published : Aug 16, 2019, 5:52 PM IST

नाशिक- पैशांच्या पावसाचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्या भोंदूबाबासह त्याच्या साथीदाराला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. श्रीमंती मिळवून देण्यासाठी बनावट लग्न करून बलात्कार केल्या प्रकरणी गांगपूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. ही घटना गंभीर असल्याने पोलिसांनी तपासाला गती देत मुख्य संशयिताला भिवंडीतून अटक केली.

नाशिकच्या भोंदूबाबाला भिवंडीत अटक
भोंदू विनोदबाबा उर्फ तुकाराम हिरे विरोधात गंगापूर पोलिसात एका महिलेला पैशाच्या पावसाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार दाखल झाली होती. त्यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. झटपट श्रीमंती मिळवून देण्यासाठी पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून भोंदू विनोदबाबासह त्याच्या काही साथीदारांनी फसवणूक केली. विनोदबाबा याने बनावट पद्धतीने लग्न केल्याचे एक पूजा करून भासविले. त्यानंतर पीडितेसोबत बळजबरीने शरीरसंबंध ठेवून बलात्कार केला असल्याची माहिती पीडितेने पोलीसांना दिली होती.
या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात बलात्कारासह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आधी भोंदू बाबाचे सहकारी राजेंद्र गायकवाड आणि अशोक पवार यांना ओझर येथून तर भोंदू बाबाला भिवंडी येथून अटक केली. या प्रकरणात एका महिलेचाही समावेश असल्याची माहिती समोर आली असून संशयित महिला फरार आहे. दरम्यान अशा कुठल्याही आमिषाला बळी पडू नका असे आवाहन नाशिक पोलिसांनी केले आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details