नाशिक -नाशिकमधील गोदावरी नदीवर बांधण्यात आलेला ऐतिहासिक प्राचीन रामसेतू पाडण्यात येणार ( Ramsetu Bridge Demolished ) आहे. पंचवटी परिसरात हा पुल आहे. या निर्णयाविरोधात स्थानिक नागरिक आणि समाजसेवक एकवटले ( Nashik Citizens On Ramsetu Bridge ) आहेत.
हा पूल पंचवटी ते नाशिक गावाला जोडतो. 1930 पासून गावातून काळाराम मंदीरात जाण्यासाठी हा एकमेव पुल होता, असे सांगितलं जातं. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून रामसेतूची अवस्था बिकट झाली आहे. पुलावरील अनेक भाग पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत नमामी गोदा प्रकल्प हाती घेण्यात आला असून, त्यामध्ये रामसेतूही पाडण्याचे प्रस्तावित आहे.
पण, हा पूल पाडण्याऐवजी त्याची दुरुस्ती करा, अशी मागणी स्थानिक करत आहेत. पूल पाडल्यावर तेथील दुकानदारांवर उपासमारीचीही वेळ येईल. त्यापार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक आणि समाजसेवकांच्या वतीने रामसेतू बचाव अभियानही राबविण्यात येत आहे.