महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nashik Crime : राजस्थान शौचालयावरील जाहिरात फसवणूक प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या मुलाची होणार चौकशी

राजस्थान पर्यटन विभागाच्या शौचालयावर जाहिराती व सरकारी विभागांमध्ये टेंडर देण्याच्या नावाखाली नाशिकचे व्यवसायिक सुशील पाटील यांची 6 कोटी 80 लाख रुपयांची फसवणूक झाली होती. या प्रकरणात नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात 14 संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik Crime
Nashik Crime

By

Published : Mar 21, 2022, 7:46 PM IST

नाशिक - राजस्थान पर्यटन विभागाच्या शौचालयावर जाहिराती व सरकारी विभागांमध्ये टेंडर देण्याच्या नावाखाली नाशिकचे व्यवसायिक सुशील पाटील यांची 6 कोटी 80 लाख रुपयांची फसवणूक झाली होती. या प्रकरणात नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात 14 संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा पुत्र वैभव गहलोत याचाही समावेश आहे. गुन्ह्याची व्याप्ती पाहता, हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. या प्रकरणात आता पोलिसांकडून मुख्यमंत्र्यांचे पुत्र वैभव गहलोत यांना देखील चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे.

काय आहे प्रकरण
सुशील पाटील यांच्या तक्रारीनुसार 2018 ते 2020 या कालावधीत पाटील आणि यांच्या संबंधित व्यावसायिकांना संशयित सचिन पुरुषोत्तम वेलेरा, (जोधपुर) वैभव गेहलोत (जोधपुर) किशन कांतेलिया, सरदारसिंग चौहान, नीडल क्राफ्ट कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी प्रवीणसिंग चौहान, सुहाभ मकवाल, निरोवभाई विमाभट, राजबिरसिंग शेखावत, बिस्वरंजन मोहंती, सावनकुमार पारनेर, विनोदचंद्र प्रकाश, संजयकुमार देसाई, विराज पंचाल, रिशिता शहा यांनी संगनमत केले. आणि राजस्थान सरकारच्या पर्यटन विभागाच्या शौचालयावरील जाहिरातीचे सर्व टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवून 6 कोटी 80 लाखांची फसवणूक केली.

6 कोटी 80 लाखांची फसवणूक
सुशील पाटील यांनी त्यांचे सहकारी व्यवसायिक यांना या कामकाजाची माहिती दिली. 2018 ते 2020 या कालावधीत 3 कोटी 96 लाख 54 हजार 778 रुपये आरटीजीएसद्वारे संशयित आरोपींच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले. तर काही रक्कम रोख दिली. असे एकूण 6 कोटी 80 लाख रुपये दिले.

हेही वाचा -Woman Body Found : मानोली परिसरात पत्र्याच्या पेटीत आढळला महिलेचा मृतदेह

ABOUT THE AUTHOR

...view details