महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला ५ वर्ष मूर्ख बनवले - राज ठाकरे - cONGRESS

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची नाशिक येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यासभेत राज यांनी खास ठाकरी शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपवर निशाणा साधला. मोदींना बहुमत मिळाले पण देशातील उद्योगपती पैसे घेऊन पळाल्याचा घणाघात राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केला.

राज ठाकरे यांची सभा

By

Published : Apr 27, 2019, 12:23 AM IST

नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला मूर्ख बनवले आहे. मोदी हुतात्मा जवानांच्या नावाने मत मागत आहेत. त्यांनी मागील वेळेसही जनतेला आश्वासने देऊन सत्ता प्राप्त केली. मात्र, मोदींना बहुमत मिळाले पण देशातील उद्योगपती पैसे घेऊन पळाल्याचा घणाघात राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केला.

राज ठाकरे यांची सभा


नाशिक येथे राज ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या सभेत राष्ट्रवादींच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलीच गर्दी केली. तर राज ठाकरे यांची सभा ऐकण्यासाठी मुलगा अमित राज ठाकरे यांची सपत्नीक उपस्थिती होती.
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, की भाजपला सत्तेचा माज आला आहे. भाजप सरकार बेरोजगारांना २ कोटी लोकांना रोजगार देणार होते. मात्र, झाले उलटेच. नोटाबंदीमुळे रांगेत उभे राहुन शंभर ते सव्वाशे नागरिकांचा बळी गेला. १४ हजार शेतकऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जीएसटी आणि नोटाबंदीमुळे ५ कोटी लोकांच्य नोकऱ्या गेल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


भाजप सरकारने पत्रकार आणि माध्यमांना बाटलीत बंद केले. त्यामुळे सरकारविरोधातील मते लोकांना कळत नाही. पंतप्रधान मोदी हे नोटबंदी, बलात्कार, नोकरी, स्वच्छ भारत योजना कशाबद्दलही बोलत नाहीत अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.


देशात नोटीबंदी झाल्यानंतर २ हजार नोटा परदेशात छापल्या गेल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. खासगी कंपन्यांना लाखो रुपये बदलून दिले गेल्याचेही ते यावेळी म्हणाले. राफेलचे काम एचएएलला का दिले नाही असा सवालही त्यांनी यावेळी केला.


2016 साली झाले 39 हजार बलात्कार


भाजप सरकार महिलांसाठी विविध योजना आणल्याचे सांगत आहे. मात्र, या सरकारच्या काळात महिला सुरक्षित नाहीत. 2016 साली झाले 39 हजार बलात्कार झाल्याचा घणाघातही त्यांनी यावेळी केला.
यावेळी राज ठाकरे यांनी भाजपाध्यक्षांचा 15 लाखांचा जुमला असल्याचा व्हिडिओही दाखवला. त्यासह भाजपच्या नेत्यांचे शेतकरी विरोधातील व्यक्तव्यही त्यांनी व्हिडीओतून दाखवले.

ABOUT THE AUTHOR

...view details