नाशिक मध्यवर्ती कारागृहात कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न
मध्यवर्ती कारागृहात खूनाच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने झाडाला चादर व अंगातील बनियानच्या साह्याने दोरी करून गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र इतर कैद्यांनी वेळीच हे पाहिल्यामुळे त्याला वाचवण्यात आले आहे. याप्रकरणी कैद्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक - येथील मध्यवर्ती कारागृहात खूनाच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने झाडाला चादर व अंगातील बनियानच्या साह्याने दोरी करून गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र इतर कैद्यांनी वेळीच हे पाहिल्यामुळे त्याला वाचवण्यात आले आहे. याप्रकरणी कैद्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुलतान भिकन तडवी हा कैदी नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात खूनाच्या आरोपात शिक्षा भोगत आहे. सुलतान तडवीने शिक्षेला वैतागून मध्यवर्ती कारागृहात असलेल्या मंडल सात यार्ड क्रमांक 2 येथील बॅरेक क्रमांक दोनच्या पाठीमागे असलेल्या पिंपळाच्या झाडाला बनियान व चादर यांची एक दोरी बनवून गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना इतर बंदिवान व कारागृहातील कर्मचाऱ्यांना समजताच त्यांनी त्याला आत्महत्या करण्यापासून रोखले. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात घनश्याम बाळू मोहन यांनी तक्रार दाखल केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेळके हे करत आहेत.