महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Principal Beating Student in Nashik : विद्यार्थ्याला बेदम मारहाण, महिला प्राचार्याविरोधात गुन्हा दाखल - महिला प्राचार्याविरोधात गुन्हा दाखल

जेलराेड येथील नारायण बापू नगरातील स्काॅटीश अकॅडमी या शाळेत महिला प्राचार्याने चार ते पाच मुलांच्या अंगावर वळ उठेपर्संत जबर फटके दिल्याची धक्कादायक घटना साेमवारी (दि. 28 फेब्रुवारी) सायंकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी उपनगर पाेलीस ठाण्यात पीडित विद्यार्थ्याच्या काकाने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल ( Case Filed ) करण्यात आला आहे. रमा रेड्डी, असे संशयित प्राचार्य महिलेचे नाव आहे.

छायाचित्र
छायाचित्र

By

Published : Mar 1, 2022, 3:59 PM IST

Updated : Mar 1, 2022, 7:16 PM IST

नाशिक- जेलराेड येथील नारायण बापू नगरातील स्काॅटीश अकॅडमी ( Scottish Academy Nashik ) या शाळेत महिला प्राचार्याने चार ते पाच मुलांच्या अंगावर वळ उठेपर्संत जबर फटके दिल्याची धक्कादायक घटना ( Principal Beating Student in Nashik ) साेमवारी (दि. 28 फेब्रुवारी) सायंकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी उपनगर पाेलीस ठाण्यात पीडित विद्यार्थ्याच्या काकाने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल ( Case Filed ) करण्यात आला आहे. रमा रेड्डी, असे संशयित प्राचार्य महिलेचे नाव आहे.

विद्यार्थ्याला बेदम मारहाण, महिला प्राचार्याविरोधात गुन्हा दाखल

वर्गातील खिडकीची काच फाेडली म्हणून जबर मारहाण -याबाबत कैलास बबन ढिकले (रा. ढिकले नगर, कॅनाॅल राेड, जेलराेड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा 15 वर्षीय पुतण्या स्काॅटीश अकॅडमीत इयत्ता दहावीत शिकताे. साेमवारी (दि.28) ताे वर्गात असताना दुपारच्या सुमारास कुणीतरी वर्गातील खिडकीची काच फाेडली. काच ढिकले यांच्या पुतण्यानेच फाेडली, असा संशय घेऊन रेड्डी यांनी त्याला जबर मारहाण केली. तसेच इतर चार ते पाच मुलांनाही काठीने मारहाण केली. त्यात ढिकले यांच्या पुतण्याच्या पाठीवर व पाेटावर मारल्याने त्याच्या अंगावर जबर वळ उठले आहेत. तसेच तक्रार केली तर मुलांना नापास करू, लालशेरा मारू, असा दम दिल्याचा आराेपही ढिकले यांनी केला आहे. याबाबत उपनगर पाेलीस ठाण्याकडून तपास केला जात आहे. दरम्यान, या घटनेने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. मारहाण केल्यानंतर पोलिसांत जाल तर मुलांचे दहावीचे वर्ष बरबाद करू, अशी धमकीही देण्यात आल्याचे पालकांनी सांगितले. काही मुले दहावीच्या भीतीने पोलिसांत तक्रार देण्यास घाबरत असल्याचेही पालकांकडून सांगण्यात आले आहे.

शिक्षेसाठी मर्यादा हवी -माझ्या विद्यार्थीय चुकत असले तर त्यांना शिक्षा देणे हे शिक्षकांचे काम आहे व दिलीच पाहिजे. पण, त्या शिक्षेला काही हद्द असावी. इतकी मारहाण केल्यानंतर पीडित मुलाची आई शाळेत गेली असता त्यांच्या हातातील मोबाईल हिसाकवून प्राचार्याने नुकसान भरपाई म्हणून पाच हजारांची मागणी केली, असाही आरोप तक्रारदार ढिकले यांनी केला आहे.

हेही वाचा -नाशिकमध्ये मराठी भाषा भवन उभारण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करू - मंत्री उदय सामंत

Last Updated : Mar 1, 2022, 7:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details