नाशिक - कुणाच्याही आयुष्यात कालसर्प किंवा पितृपक्ष पूजा सांगितली की अस्वस्थ होत असतो. त्यामागे अनेक कारणे असतात. गृहयोग बदलल्यास योग येतो आणि त्याच्या शांततेसाठी पुरोहित पूजा करायला सांगतात. मात्र, पितृपक्षात या पूजा अनेक महत्त्वाच्या ठिकाणी केल्या जातात. विशेषतः बारा ज्योतिर्लिंग किंवा कुंभाच्या ठिकाणी केल्या जातात. या पूजाअर्चावरून अत्यंत वाद झाले आहेत. मात्र कालसर्प दोष हा भयंकर मानला जातो. मात्र प्रत्यक्षात तसे नाही....
नाशिकचे पुरोहित सांगत आहेत कालसर्प आणि पितृपक्ष पूजेचे महत्व
आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि त्यांचे पूजन व्हावे यासाठी म्हणून दरवर्षी गणेशोत्सवानंतर येणाऱ्या भाद्रपदातील पितृपक्षात अधिक महत्त्व आहे.हे महत्त्व जरी पितरांसाठी असले तरीही त्यासाठी एक धार्मिक महत्त्व सुद्धा आहे. हिंदू धर्मामध्ये पित्तर पाटा हा साजरा केला जातो, येत्या 21 सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू होत आहे.
कालसर्प हा दोष नसून तो एक योग
कालसर्प हा दोष नसून तो एक योग आहे. कालसर्प योगाचा काही प्रमाणावर नकारात्मक प्रभाव आपल्यावर पडू शकतो. ज्योतिष हे एक शास्त्र आहे. प्रत्येक माणसाची जन्मकुंडली, त्यातील ग्रहांची स्थाने यांवरून त्याचे व्यक्तिमत्त्व, स्वभाव, भविष्यातील घटनांचा एक अंदाज बांधला जातो. एका माणसाचे अनेक प्रकारे भविष्य सांगितले जाऊ शकते. जन्मकुंडली हा त्यातील एक भाग आहे. कालसर्प दोष हा खूप काही भयंकर आहे, असे मानले जाते. मात्र, तसे नाही. कालसर्प हा दोष नसून तो एक योग आहे. कालसर्पाविषयी अनेक समजुती, गैरसमजुती आहेत. कालसर्प घातकी आहे, असे मानले जाते. मात्र, तसे काहीही नाही.
भाद्रपद महिन्यात केली जाते पूजा
येत्या 21 सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू होत असून त्याची 6 ऑक्टोंबर भाद्रपद अमावस्याला समाप्त होणार आहे. या पितृपक्षातील पूजेमुळे आयुष्यामध्ये असलेले दोष हे दूर करण्यासाठी आणि आपल्या पूर्वजांना आत्म्यास शांती मिळावी त्यांचे आशीर्वाद मिळावे यासाठी म्हणून या कालावधीमध्ये ही पूजा केली जाते. भाद्रपदाच्या पुढील पुढील पंधरवड्यात येणाऱ्या पितृपक्षामध्ये पितराची पूजा केली जाते. पितरांचा आत्मा शांत आहेतच परंतु त्यापासून आपले आणि आपल्या परिवाराचे रक्षण व्हावे यासाठी या पूजेला खूप महत्त्व आहे. ही पूजा फक्त भाद्रपद महिन्यातील पितर पाट यातच केली जाते. इतर वेळेस ही पूजा केली जात नाही.ज्यावेळी एखादी व्यक्ती चे निधन होते त्यावेळी पूजेसाठी आलेले ब्राह्मण हे पितरांची म्हणजे निधन झालेल्या व्यक्तीच्या शांतीसाठी एक पूजा करतात. या पूजेचा भात आणि काळे तीळ वापरले जातात. जव म्हणजे गव्हातील एक प्रकार असतो त्याला जव वापरतात.
हेही वाचा -टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये भारताची विक्रमी कामगिरी, 5 सुवर्णसह जिंकली 19 पदके