महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाशिक पोलिसांना सलाम : गर्भवती महिलेला पोलीस व्ह‌ॅनमधून दवाखान्यात नेले - भारतनगर

नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्याचे कर्मचारी बीट मार्शल पोलीस हवालदार संजय लोंढे आणि पोलीस शिपाई अत्तार हे, रात्री 'त्या' ठिकाणी गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना 'हा' सर्व प्रकार लक्षात आला. त्यांनी प्रसंगावधान दाखवत वेळ न दवडता पोलीस ठाण्याची मोबाइल व्हॅन बोलावून घेतली.

pregnant woman admited in hospital by police van
पोलीस व्हॅनच्या माध्यमातून गर्भवती महिलेला केले रुग्णालयात दाखल

By

Published : Apr 8, 2020, 8:29 PM IST

नाशिक - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन आहे. त्यासोबतच राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अशातच नाशिकच्या भारतनगर येथे राहणाऱ्या एका महिलेला मध्यरात्री प्रसूती कळा सुरू झाल्या. या महिलेच्या घरातील व्यक्तींनी 108 क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका बोलावली. मात्र, रुग्णवाहिका वेळेवर येऊ शकली नाही. तसेच शेजारील नागरिकांपैकी कोणीही मदतीला आले नाही. अशावेळी तिथे असलेल्या पोलिसांनी त्यांना मदत केली.

नाशिक पोलिसांना सलाम : गर्भवती महिलेला पोलीस व्ह‌ॅनमधून दवाखान्यात नेले

हेही वाचा...#coronavirus लॉकडाऊनच्या काळात दारूचा काळाबाजार, अनेक वाईन शॉप, बारही फोडले

मुंबई नाका पोलीस ठाण्याचे कर्मचारी बीट मार्शल पोलीस हवालदार संजय लोंढे आणि पोलीस शिपाई अत्तार हे, रात्री त्या ठिकाणी गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना हा सर्व प्रकार लक्षात आला. त्यांनी प्रसंगावधान दाखवत वेळ न दवडता पोलीस ठाण्याची मोबाइल व्हॅन बोलावून घेतली. त्या महिलेस तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. वेळेत रुग्णालयात दाखल केल्याने काही वेळाने त्या महिलेने एका गोंडस मुलाला जन्म दिला.

त्यानंतर या महिलेने आणि तिच्या कुटुंबाने पोलीस कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले. तसेच पोलीस आयुक्त पाटील यांनी देखील पोलीस हवालदार संजय लोंढे आणि पोलीस शिपाई अत्तार यांचे कौतुक करत त्यांना प्रत्येकी 2 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

ABOUT THE AUTHOR

...view details