महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 27, 2019, 5:30 PM IST

ETV Bharat / city

'तहसिल कार्यालयातील क्लर्क ते दिंडोरीचे आमदार' नरहरी झिरवाळ यांचा प्रेरणादायी प्रवास

दिंडोरी तालुक्यातील वनारे येथील सर्वसामान्य गरीब शेतकरी कुटुंबात, दिंडोरीचे आजचे आमदार नरहरी झिरवाळ यांचा जन्म झाला. आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकंटाना सामोरे जात, यशाची एक एक पायरी चढत नरहरी झिरवाळ आज आमदार झाले आहेत...

आमदार आमदार नरहरी झिरवाळ आणि कुटुंब

नाशिक -राज्याच्या विधानसभा निवडणूकीचा निकाल गुरूवारी जाहीर झाला. राज्यभर नवनिर्वाचित आमदारांवर अभिनंदनाचा वर्षाव होत होता. दिंडोरी मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणूक लढवलेले नरहरी झिरवाळ हे देखील विजयी झाले. मात्र झिरवाळ यांचा विजय सामान्य नव्हता, आयुष्यातील अनेक संकटांचा सामना करत त्यांनी मिळवलेले यश इतरांना प्रेरणादायी आहे...

आमदार नरहरी झिरवाळ यांच्या कारकिर्दीचा आढावा

दिंडोरी तालुक्यातील वनारे येथील सर्वसामान्य गरीब शेतकरी कुटुंबात 19 जून 1959 साली नरहरी झिरवाळ यांचा जन्म झाला. त्यांच्या घरी वडीलोपार्जीत शेती व्यवसाय आहे. आजही घरी शेतीची कामे पत्नी चंद्रभागा व दोन मुले करतात. झिरवाळ देखील समाजकामातून वेळ मिळाला तर शेतीची कामे बघतात. त्यांचे प्राथमिक शिक्षण आजोळी करंजाळी येथे तर माध्यमिक शिक्षण केआरटी हायस्कूल वणी येथे झाले आहे. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण केटीएचएम कॉलेजमध्ये झाले आहे.

हेही वाचा... दिंडोरीमधून राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ विजयी, विजयानंतर रात्रभर कार्यकर्त्यांचा जल्लोष

नरहरी झिरवाळ हे 1984 साली ते दिंडोरी तहसिल कार्यालयात क्लार्क म्हणून काम करत होते. त्यांचे नोकरीत मन रमले नाही, यामुळे त्यांनी नोकरीचा राजीनामा देत व्यवसाय करण्याचे ठरविले. व्यवसायात जम बसला नाही, तेव्हा नाशिक येथील अंबड एमआयडीसीमध्ये बिगारी म्हणून काम सुरू केले. परंतु अखेर घरी येऊन शेती कराण्यास सुरूवात केली.

हेही वाचा.... दिंडोरी: सेनेला 'ओळख ना पाळख' असलेला उमेदवार अन् गटबाजी भोवली, राष्ट्रवादी ठरली वरचढ

त्याच वेळी जनता दलाचे खासदार व आमदार असलेले हरिभाऊ शंकर महाले हे त्यांचे मामा होते, त्यांचा सहवास त्यांना लाभला. वनारे येथे त्यांना ग्रामपंचायत सदस्य झाल्यानंतर गावाने त्यांना बिनविरोध सरपंच केले. तसेच गावाच्या सोसायटीचे चेअरमन केले. त्यानंतर कोशिंबे पंचायत समिती गणात जनता दलाच्या तिकिटावर निवडून येत पंचायत समिती उपसभापती पदावर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. 2002 मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून ते निवडून आले. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर शिवसेनेचे उमेदवार बी एल गांगुर्डे व अपक्ष उमेदवार रामदास चारोस्कर या तिरंगी लढतीत 25 हजार मतांनी आघाडी घेत आमदार झाले. 2009 मध्ये शिवसेनेचे उमेदवार धनराज महाले यांनी झिरवाळ यांचा 149 मतांनी पराभव केला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत साठ हजारांचे मताधिक्य घेत झिरवाळ निवडून आले आणि पराभवाची परतफेड करत त्यांनी जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य घेण्याच्या पराक्रमही करून दाखवला.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details