महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 15, 2021, 3:38 PM IST

ETV Bharat / city

लॉकडाऊनमध्ये नियमांचे उल्लंघन, नागरिकांना पोलिसांकडून दंडुक्याचा प्रसाद

प्रशासन व पोलिसांच्या वतीने वेळोवेळी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना नियमाचे पालन करा असे सांगण्यात येत होते. मात्र तरीही नागरिक ऐकत नसल्याने व विनाकारण फिरत असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी अशा नागरिकांना दंडुक्याच्या प्रसाद देण्यास सुरुवात केली आहे.

पोलिसांची कारवाई
पोलिसांची कारवाई

येवला -प्रशासन व पोलिसांच्या वतीने वेळोवेळी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना नियमाचे पालन करा, असे सांगण्यात येत होते. मात्र तरीही नागरिक ऐकत नसल्याने व विनाकारण फिरत असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी अशा नागरिकांना दंडुक्याच्या प्रसाद देण्यास सुरुवात केली आहे.

लॉकडाऊनमध्ये नियमांचे उल्लंघन, नागरिकांना पोलिसांकडून दंडुक्याचा प्रसाद

नागरिकांना दंडुक्याचा प्रसाद
राज्यात संचारबंदी लागू झाली मात्र येवल्यातील पोलिसांनी कारवाई सौम्य ठेवत नागरिकांना नियमांचे पालन करण्यास सांगितले होते. तरी देखील येवलेकरांचा बेजबाबदारपणा काही कमी होत नसल्याने व सकाळच्या बारानंतरही नागरिक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आल्याने येवला शहर पोलिसांनी अशा नागरिकांना चोप देण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे विनामास्क व विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना पण दंडुक्याच्या प्रसाद मिळत आहे. यावेळी पोलीस निरीक्षक संदीप कोळी, सहाय्यक निरीक्षक युवराज चव्हाण, पोलीस कर्मचारी व होमगार्ड आदी यावेळी कारवाई करत होते.

ABOUT THE AUTHOR

...view details