महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाशिक : विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नावे पैसे लूटणारा ठगसेन पोलिसांच्या ताब्यात - नरहरी झिरवाळ यांच्या नावे पैसे लूटणारा पोलिसांच्या ताब्यात

अनेक संस्थाचालकांना शाळा अनुदानित करून देतो सांगत फसवणूक करणाऱ्या भामट्याला वणी पोलिसांनी अटक केली आहे. राहूल आहेर असे या भामट्याचे नाव आहे.

nashik latest news
nashik latest news

By

Published : Sep 1, 2021, 3:28 AM IST

नाशिक -विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व माजी आमदार अनिल कदम यांच्या नावाचे कागदपत्र दाखवून अनेक संस्थाचालकांना शाळा अनुदानित करून देतो सांगत फसवणूक करणाऱ्या भामट्याला वणी पोलिसांनी अटक केली आहे. राहूल आहेर असे या भामट्याचे नाव आहे. दरम्यान, अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याला न्यायालयाने ३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनवली आहे.

नरहरी झिरवाळ यांचे नाव वापरून केली फसवणूक -

संशयित आरोपी दिंडोरी तालुक्यातील शिंदवड गावचा रहिवासी आहे. त्याने जिल्ह्यातील एका संस्थाचालकाला ‘तुमची शाळा अनुदानित करतो’ अशा भूलथापा देऊन दीड लाख रुपये घेऊन फसवणूक केली. याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी सापळा रचत राहूल आहेर याला अटक केली. यावेळी पोलिसांना एका इनोव्हा गाडी क्रमांक एमएच १५ डीएम ४१७५ या गाडीवर अशोकस्तंभाची राजमुद्रा असलेला लोगो चिकटवल्याचे आढळून आले. तसेच यागाडीत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि माजी आमदार अनिल कदम यांच्या नावाचे कागदपत्रही आढळून आले.

हेही वाचा - corona update - राज्यात आज ४१९६ कोरोनाचे नवे रुग्ण, १०४ जणांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details