नाशिक - ऊसतोडीसाठी दिलेली उचल परत न केल्यानेमहिला मुकादमाने ऊसतोड कामगार असलेल्या दाम्पत्याला चप्पल व लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना नांदगाव तालुक्यातील पिंप्राळे शिवारात डिसेंबर २०२० मध्ये घडली होती. या घटनेचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या महिलेविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात होता. मारहाणीचा व्हिडीओची चौकशीची करत पोलिसांनी मारहाण करणाऱ्या महिलेला अटक केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली आहे.
ऊसतोड कामगार दाम्पत्याला मारहाण करणारी महिला पोलिसांच्या ताब्यात, सोशल मिडियावर व्हायरल झाला होता व्हिडिओ दाम्पत्याने ऊसतोडीला जाण्यासाठी घेतले होते 1 लाख 60 हजार रूपये -
ऊस तोडी साठी दिलेली उचल रक्कम परत न केल्याने एका महिला मुकादमाने ऊस तोड कामगार दांपत्याला चप्पल आणि लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नांदगाव तालुक्यातील पिंप्राळे शिवारात डिसेंबर 2020 मध्ये ही घटना घडली असून हा व्हिडिओ आता बाहेर वायरल झाल्याने या मुकादम महिलेवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. पोलिसांनी या घटनेची दखल घेत मुकादम महिले विरोधात गुन्हा दाखल केला आहे. डिसेंबर 2020 मध्ये पिंप्राळे शिवारात राहणाऱ्या पिंटू सोनवणे आणि त्यांची पत्नी अंबाबाई यांनी नात्याने मावस बहीण आणि ऊसतोड मुकादम असलेल्या संगीता वाघ या महिलेकडून टोळीत ऊसतोडीला जाण्यासाठी 1 लाख 60 हजार रुपयांची रक्कम उचल घेतली होती. मात्र, संगीता हिच्या टोळीत कामाला न जाता हे दांपत्य इतर टोळीत ऊसतोडणीसाठी गेल्याच्या रागातून संगीता वाघ हिने या दांपत्याला बेदम मारहाण केली होती. हाच व्हिडीओ काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत होता. दरम्यान या प्रकरणाची दखल घेऊन नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मारहाणीच्या व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे थेट मुख्यमंत्र्यांकडे कडे पोहोचला -
दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी संगीता वाघ हिला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान पिंप्राळे येथे घडलेला हा संतापजनक प्रकार सोशल मीडियाद्वारे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पोहोचल्याच देखील बोलले जात आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने मारहाण झालेल्या दांपत्याला अखेर उशिरा का होईना पण न्याय मिळाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.