महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाशिक : दगडफेक करणाऱ्यांना अद्दल; पोलिसांनी काढली शहरभर धिंड - Nashik PI Sushachandra Deshmukh

दगडफेकीसाठी जबाबदार असलेल्या संबंधितांवर कारवाई करण्याचे पोलीस आयुक्तांनी आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी सापडलेल्या सात संशयितांना अटक केली.

आरोपींची शहरभर धिंड
आरोपींची शहरभर धिंड

By

Published : Feb 23, 2021, 10:31 PM IST

नाशिक - देवळाली कॅम्प येथे दगडफेक करून पोलिसांना जखमी केलेल्या सात संशयितांना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडविली आहे. अटकेत असलेल्या चारणवाडी परिसरातील सात संशयितांची पोलिस बंदोबस्तात शहरभर धिंड काढण्यात आली आहे.



शिवजयंतीच्या रात्री चारणवाडीतील समाजकंटकांनी त्रिमूर्ती चौक परिसरात झालेली गर्दी पांगविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक झाली होती. या दगडफेकीत दोन पोलीस गंभीर जखमी झाले. या घटनेची पोलीस आयुक्त दीपक पांड्ये यांनी गंभीर दखल घेतली. दगडफेकीसाठी जबाबदार असलेल्या संबंधितांवर कारवाई करण्याचे पोलीस आयुक्तांनी आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी सापडलेल्या सात संशयितांना अटक केली. देवळाली पोलीस ठाणे येथून कडक बंदोबस्तात शहरातील विविध ठिकाणी त्यांची धिंड काढण्यात आली. उर्वरित संशयित आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पोलिसांना जखमी केलेल्या सात संशयितांना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडविली



गुंड प्रवृत्तीचा बिमोड करण्यात येईल-

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख म्हणाले की, शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याचे काम पोलिसांचे आहे. त्याला गालबोट लावण्याचे काम जो कोणी करत असेल तर अशा गुंड प्रवृत्तीचा बिमोड करण्यात येईल. यात कुणाचीही गय केली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details